---Advertisement---

हे पाप कुठे फेडणार? विजयानंतरही पाकिस्तानवर होतोय चिटींग केल्याचा आरोप, जाणून घ्या कारण

Pakistan-Team
---Advertisement---

ऑगस्ट २७, पासून सुरू होत असलेल्या आशिया चषक २०२२ च्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ नेदरलँड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना अतिशय अटीतटीचा राहिला. या सामन्यात अखेर पाकिस्तानने ९ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने खिशात घातली. परंतु पाकिस्तान संघाने चिटिंग करत हा सामना जिंकला आहे, अशी टीका सोशल मीडियावर केली जाऊ लागली आहे. त्यामागचे कारण जाणून घेऊ…

पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नेदरलँडच्या फलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला. एकवेळ नेदरलँडचा संघ विजयाच्या नजीक दिसत होता. परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात सामना पालटला.

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ४६ वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर नेदरलँडचा सेट झालेला फलंदाज टॉम कूपर बाद झाला. ४ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची प्रशंसनीय खेळी खेळत त्याला पव्हेलियला परतावे लागले. तो बाद झाल्यानंतर लगन बीक फलंदाजीसाठी आला होता. पाकिस्तानी गोलंदाज वसीमने बीकला फुल टॉस चेंडू टाकला. तो चेंडू फलंदाजाच्या वरून गेला. अशात या चेंडूला पंचांनी नो बॉल देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी वाइडचा इशारा केला. याच कारणामुळे क्रिकेट चाहते पाकिस्तान संघावर चिटिंगचा आरोप करत आहेत.

क्रिकेटमधील नियमांनुसार, जर चेंडू एखाद्या फलंदाजाच्या वरून जात असेल, तर त्याला नो बॉल दिले जाते. परंतु पंचांनी तो वाइड बॉल दिला. हे षटक सुरू झाले तेव्हा नेदरलँडला विजयासाठी ३० चेंडूत ३५ धावांची गरज होती. जर हा नो बॉल दिला गेला असता, तर नेदरलँडला फ्री हिट मिळाली असती आणि एक जास्तीची धावही त्यांच्या खात्यात जोडली गेली असती.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---