दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात रविवारी (12 फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जात आहे. उभय संघ या सामन्यातून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करतील. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाकिस्तान संघाच्या बाजूने लागला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICC Women's T20 WC 2023. PAKISTAN won the toss and elected to Bat. https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 12, 2023
केपटाऊन येथील न्यूलँड मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला नियमित उपकर्णधार स्मृती मंधाना हिची सेवा मिळू शकणार नाही. सराव सामन्या दरम्यान झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे ती या सामन्यात भाग घेऊ शकली नाही. तिच्या जागी यास्तिका भाटिया सलामीला येईल. तसेच, अतिरिक्त फलंदाज म्हणून हरलीन देओल खेळताना दिसेल.
जवळपास दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करत असलेली शिखा पांडे देखील अंतिम अकरामध्ये आपली जागा बनवण्यात अपयशी ठरली. नुकत्याच झालेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार असलेल्या शफाली वर्मा हिच्यावर मोठी जबाबदारी असेल.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): जावेरिया खान, मुनीबा अली(यष्टीरक्षक), बिस्माह मारूफ(कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.
(Pakistan Won Toss And Choose To Bat Smriti Mandhana Misses Out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते