Jasprit Bumrah Bowling Action Video: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या भेदक गोलंदाजीचा चाहतावर्ग मोठा आहे. बुमराह त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीने फलंदाजांच्या दांड्या उडवतो. भलेभले क्रिकेटपटूही त्याच्या बॉलिंग ऍक्शनचे चाहते आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हादेखील बऱ्याचदा बुमराहच्या बॉलिंग ऍक्शनची नक्कल करताना दिसला आहे. आता बुमराहच्या बॉलिंग ऍक्शनची हूबेहूब नक्कल करणाऱ्या एका पठ्ठ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा पठ्ठ्या भारतीय नसून पाकिस्तानातील आहे.
पाकिस्तानातील एका चिमुकल्याच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी तरुणाने भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहची गोलंदाजी तंतोतंत कॉपी केली आहे. या व्हिडिओमध्ये, तरुण मुलाने अचूक लाईन लेन्थ राखत चार चेंडू टाकले, ज्यामुळे फलंदाज धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim AKram) या लहान मुलाचा व्हिडिओ पाहून खूप प्रभावित झाला आहे. ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसीम अक्रमने या तरुण गोलंदाजाच्या व्हिडिओवर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. अक्रमने हा व्हिडिओ त्याच्या एक्स अकाउंटवर रिट्विट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी आजचा सर्वोत्तम व्हिडिओ.’
Wah jee wah look at that control and action exactly like the great @Jaspritbumrah93 video of the day for me . #crickethavenoboundiers https://t.co/Ut215HD3iB
— Wasim Akram (@wasimakramlive) July 15, 2024
बुमराहचा टी20 विश्वचषकात धमाका
दरम्यान, बुमराहने नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करून भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बुमराहने टी20 विश्वचषक 2024 मध्ये 8 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूने वळवला होता. त्याने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात 4 षटकांमध्ये 18 धावा देऊन दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?