भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावेळी चाहत्यांचा उत्साह वेगळ्याच उंचीवर असतो. दोन्ही संघ मैदानावर आमने-सामने येतात, तेव्हा क्रिकेटप्रेमी हातातली कामे सोडून सामना पाहत बसतात. दुसरीकडे मैदानावरही खेळाडूंमध्ये अनेकदा वातावरण तापल्याचे पाहायला मिळते, जे पाहणे चाहत्यांना खूपच आवडते. मागील काही वर्षांपासून दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा खेळाडू एकमेकांशी चेष्टा-मस्करी करताना दिसतात. कदाचित हीच गोष्ट काही पाकिस्तानी पत्रकारांना आवडली नाहीये.
खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पत्रकार परिषदेदरम्यान वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. व्हिडिओत रिपोर्टर रौफला विचारतो की, “एक वेळ अशी होती, जेव्हा पाकिस्तान गोलंदाजात वातावरण तापल्याचे असायचे, खासकरून जेव्हा ते भारताविरुद्ध डोळ्यात डोळे घालून खेळायचे, त्याची खूप चर्चा व्हायची. ते दृश्य आता पाहायला मिळत नाही?”
या प्रश्नाचे उत्तर देताना हॅरिस रौफ म्हणाला की, “त्यांच्यासोबत भांडावे का? युद्ध थोडीच सुरू आहे. लोकांचा विश्वास असो किंवा नसो आम्ही आक्रमकता दाखवतो. एक संघ म्हणून आमचा स्वत:वर विश्वास आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ. आम्ही लोकांना पाहत नाही की, त्यांना आमच्यावर विश्वास आहे की नाही. जर आम्ही स्वत:वर विश्वास ठेवून खेळलो, तर चांगला निकाल येईल.”
Chad Haris Rauf 😂😂 pic.twitter.com/reThw3vfdH
— Maham Fatima (@Maham_0fficial) September 25, 2023
आशिया चषक 2023 स्पर्धेत झालेला सामना
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात अखेरचा सामना आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत झाला होता. या स्पर्धेतील उभय संघातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते.
आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान संघात महामुकाबला खेळला जाणार आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, पाकिस्तान संघ मागील पराभवाचा बदला घेण्यात यशस्वी ठरतो की नाही. (pakistani bowler haris rauf gave funny answer question showing aggression india read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटसाठी ही वेळ खराब नसेल…’, कोहलीने कधी घ्यावी Retirement? एबी डिविलियर्सने स्पष्टच सांगितले
न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain