---Advertisement---

‘मला भारतीय असल्याचा अभिमान’, म्हणत हसन अलीच्या पत्नीचे पाकिस्तानी चाहत्यांना तिखट प्रत्युत्तर

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 3:17 PM
---Advertisement---

जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यानंतरही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले.

संपूर्ण टी२० विश्वचषकात अपराजित राहिलेल्या पाकिस्तान संघाला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने नमवले. या पराभवासह पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकाच्या अगदी जवळ पोहोचून जेतेपदाची चव चाखू शकला नाही.

या सामन्यादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या घडीला पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा सोपा झेल सोडला. त्यानंतर पुढील सलग ३ चेंडूंवर वेडने सलग षटकार खेचले आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याच्यावर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर पाकिस्तानी चाहत्यांनी निशाणा साधला आहे.

अनेकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे. त्याच्याबरोबरच त्याची पत्नी सामिया आरझू हिलाही वेठीस धरले आहे. सामिया ही भारतीय आहे आणि त्यावरूनही तिला रॉ एजंट व पनवती असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नव्हे तर अली आणि सामिया यांच्या मुलीवरही अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे.

यानंतर संतापलेल्या सामियाने ट्विट केले आहे की, “मी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आवाहन करू इच्छिते की, त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांकडून आमच्या कुटुंबियांवर होणाऱ्या टीकांवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी. पाकिस्तानी चाहत्यांचा राग मी समजू शकते, परंतु विजय आणि पराभव हे खेळाचाच भाग आहेत.”

पुढे तिने लिहिले की, “अनेक पाकिस्तानी चाहत्यांना असे वाटते की मी भारतीय एजंट किंवा पनवती आहे. याचे मला खूप वाईट वाचले. पाकिस्तानी संघाने सोन्यासारखी संधी गमावली, त्यांना जेतेपदाच्या इतक्या नजीक येऊन पराभव पत्कारावा लागला याचे हसन अलीची पत्नी म्हणून मलाही वाईट वाटते आहे. पण, सामन्यानंतर आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत.”

”मी पाकिस्तानच्या लोकांना नम्रपणे आवाहन करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी कोणती रॉ एजंट नाही आणि माझा पती हसन अली हा शिया आहे म्हणून त्याने झेल सोडला, असे तर अजिबात नाही. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटूद्या आणि असे आरोप करणे थांबवा,” असेही तिने ट्वीटमध्ये म्हटले.

परंतु आपल्या या विनंतीनंतरही आपल्यावर टिकेचा भडिमार सुरूच असल्याने सामियाने तिचे ट्वीटर अकाउंट डिलिट करुन टाकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानला पाणी पाजत ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मॅथ्यू वेडच्या हातावर कुणाचा टॅट्यू आहे?

पाकिस्तानचा घाम काढणाऱ्या मॅथ्यू वेडच्या कारकिर्दीवर लागला पूर्णविराम? न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटची मॅच

सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, ‘मी अजिबात खुश नाही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---