पाकिस्तान क्रिकेट संघाला 7 सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडकडून 4-3ने पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला टीकेचा सामना करावा लागला. मात्र, आता त्याने या टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून भारतीय खेळाडूंच्या विक्रमांशी बरोबरी साधली आहे. बाबरने काय कारनामा केलाय चला जाणून घेऊया…
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या तिरंगी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाबरने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बाबरने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 79 धावांची विस्फोटक अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर त्याने भारतीय दिग्गजांच्या विक्रमांची बरोबरी केली.
तिरंगी मालिकेतील या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 8 विकेट्स गमावत 147 धावा चोपल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 10 चेंडू राखून सामना खिशात घातला. त्यांनी 18.2 षटकात 4 विकेट्स गमावत 149 धावा चोपल्या. यामध्ये कर्णधार बाबर आझम याने नाबाद 79 धावांची खेळी केली. या धावा त्याने 53 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त शादाब खान यानेच 30 हून अधिक धावा चोपल्या. त्याने 34 धावांचे योगदान दिले.
A comfortable victory for Pakistan 🎉 #NZvPAK | Scorecard: https://t.co/6YukweEltv pic.twitter.com/xFwSdK88OA
— ICC (@ICC) October 8, 2022
बाबरने ही अर्धशतकी खेळी करताना विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. हे बाबरचे टी20 क्रिकेटमधील 28वे अर्धशतक आहे. त्याने टी20मध्ये सर्वाधिक 28 अर्धशतके चोपण्याच्या बाबतीत विराटची बरोबरी केली आहे. बाबर आणि विराट यांनी 84 डावांमध्ये 28 अर्धशतक झळकावले आहेत.
बाबरची रोहितच्या विक्रमाशीबी बरोबरी
याव्यतिरिक्त धावांचा पाठलाग करताना बाबरची ही टी20 क्रिकेटमधील 12वे अर्धशतक आहे. त्याने याबाबतीत रोहित शर्मा याची बरोबरी केली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहितनेही इतकेच अर्धशतक झळकावले आहेत. दुसरीकडे, विराटने धावांचा पाठलाग करताना 19 अर्धशतक झळकावले आहेत. या यादीत डेविड वॉर्नर याच्या नावाचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजच्या वेगापुढे डी कॉकने टेकले गुडघे, पापणी लवण्याच्या आतच उडवल्या दांड्या; व्हिडिओ पाहाच
टी20 क्रिकेटमधील ‘न भूतो’ कामगिरी शाकिबच्या नावे; इतिहासात आजवर कोणीच पोहोचले नाही जवळपास