---Advertisement---

‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया

Mohammad-Rizwan-And-Babar-Azam
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 7 वर्षांनंतर भारतात आला आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ 26 सप्टेंबर रोजी लाहोरहून रवाना झाला होता. त्यानंतर दुबई मार्गे संघ 27 सप्टेंबरच्या रात्री हैदराबाद येथे पोहोचला. हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे जंगी स्वागत झाले. पाकिस्तान संघाचे सुरुवातीचे दोन्ही सामने हैदराबादमध्येच खेळायचे आहेत. अशात भारतीयांनी केलेल्या स्वागतावरून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

खेळाडूंच्या प्रतिक्रिया
पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी सोशल मीडियाद्वारे स्वागत कसे वाटले, हे सांगितले. कर्णधार बाबर आझम याने जंगी स्वागताचा फोटो शेअर करत लिहिले की, “हैदराबादमध्ये मिळालेले प्रेम आणि पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो.”

Babar-Azam-Insta
Photo Courtesy: Instagram/babarazam

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यानेही इंस्टाग्राम स्टोरीवर भारतात आल्यानंतर केलेल्या स्वागताबद्दल प्रतिक्रिया दिली. रिझवान म्हणाला, “येथील लोकांनी आमचे शानदार स्वागत केले, सर्वकाही चांगले होते. पुढील 1.5 महिन्याची प्रतीक्षा आहे.”

Mohammad-Rizwan-Insta
Photo Courtesy: Instagram/mrizwanpak

पाकिस्तान क्रिकेट संघाला आपला पहिला सराव सामनाही हैदराबाद येथे खेळायचा आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात 29 सप्टेंबर रोजी सराव सामना खेळला जाणार आहे. हा सामना प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला नाहीये.

पाकिस्तान क्रिकेट संघाला आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेतील आपला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरुद्ध खेळायचा आहे. यानंतर पाकिस्तान 10 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्येच श्रीलंकेविरुद्ध आपला दुसरा सामना खेळेल. तसेच, 14 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने असतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडेल. त्यानंतर पाकिस्तान 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पर्धेतील चौथा सामना खेळेल.

तसेच, पाकिस्तानच्या पुढील सामन्यांविषयी बोलायचं झालं, तर 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आणि 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. हे दोन्ही सामने चेन्नईमध्येच होतील. तसेच, 31 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात कोलकाता येथे सामना खेळला जाईल. 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरू येथे सामना पार पडेल. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आपला अखेरचा साखली सामना कोलकाता येथे खेळेल. या सामन्यात पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल. पाकिस्तान संघ जर उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना कोलकाता येथे खेळला जाईल. (pakistani cricket team reached hyderabad for the world cup 2023 the first reaction of babar azam and mohammad rizwan know here)

हेही वाचा-
CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---