---Advertisement---

किपर की कॉमेंटेटर? आझमच्या स्टंप माईकवरील मजेशीर कमेंट्स ऐकून आवरणार नाही हसू

On: शनिवार, ऑगस्ट 5, 2023 8:56 PM
Azam Khan
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू मोईन खान याचा मुलगा आझम खानला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात संधी मिळत नसेल, पण हा फलंदाज जगभरातील टी-20 क्रिकेट स्पर्धेत भाग घेत असतो. आझम सध्या कॅनडा टी20 स्पर्धे मध्ये सहभागी होत असून, तेथे तो आक्रमक फलंदाजी करत आहे. आझम खान यष्टिरक्षक आणि फलंदाज या दुहेरी भूमिकेत, तो त्याच्या संघ मिसिसॉगा पँथर्ससाठी चांगली कामगिरी करत आहे. या संबंधित आझम खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो यष्टीरक्षक म्हणून स्टंपच्या मागे कॉमेंट करताना दिसत आहे.

आझम खान ( Azam khan) फलंदाजी सोबत यष्टीरक्षणही करतो. त्याचे मजेदार बोलणे स्टंपच्या माइकमध्ये मजेदार रेकॉर्ड झाले आहे. आझम खान विकेटच्या मागून गोलंदाजाला काहीतरी बोलतांना आणि वेगवेगळे भाव देताना दिसत आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि याष्टीरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) देखील खेळपट्टीवर असताना असेच मजेशीर बोलत असतो. आझमचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला, जो खूपच मजेदार आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आझम खान या स्पर्धेत धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे
आझम खान मिसिसॉगा पँथर्स संघाचा एक खेळाडू आहे. वेस्ट इंडिज संघाचा महान फलंदाज ख्रिस गेल देखील त्या संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत धावा करण्याच्या बाबतीत आझम खान दुसऱ्या स्थानावर आहे. तर कॉलिन मुनरो हा पहिल्या क्रमांकावर आहे. कॉलिन मुनरोने या स्पर्धेत आतापर्यंत चार डावांत 212 धावा केल्या आहेत, तर आझम खानने सहा सामन्यांत 179 धावा केल्या आहेत. (pakistani cricketer azam khan stump mic recording funny to speak)

महत्वाच्या बातम्या:  
रिटायर झाल्यानंतर ब्रॉडने सांगितले सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजाचे नाव, म्हणाला, “त्याचा रनअपच भारी”
‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---