Shadab Khan Stretcher: खेळ कुठलाही असो, त्या खेळात खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा असणे खूपच गरजेचे असते. काही वेळा या सुविधा नसल्यामुळे त्या-त्या क्रिकेट बोर्डाचं जगभरात हसू झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, पाकिस्तानच्या नॅशनल टी20 कप सामन्यादरम्यान रविवारी (दि. 3 डिसेंबर) वेगळीच घटना पाहायला मिळाली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. चला तर, जाणून घेऊयात…
शादाब खान दुखापतग्रस्त
सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये देशांतर्गत क्रिकेट हंगामही खेळला जात आहे. यातील नॅशनल टी20 कप स्पर्धेतील एका सामन्यात सियालकोट विरुद्ध रावळपिंडी (Sialkot vs Rawalpindi) संघ कराची येथील यूबीएल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानात आमने-सामने होते. यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना रावळपिंडीचा कर्णधार शादाब खान दुखापतग्रस्त (Shadab Khan Injured) झाला.
शादाबच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला चालताही येत नव्हते. अशात संघाचा दुसरा एक खेळाडू शादाब खान (Shadab Khan) याला पाठीवर घेऊन मैदानातून बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. आता यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Are we in 1980? How are they taking Shadab Khan off the field? Koi stretcher nahin hay kya @TheRealPCB ke pas? UBL Complex bhi Karachi mein hay, Sukkur mein toh nahin 🤦🏽♂️🤦🏽♂️ #NationalT20 pic.twitter.com/u7RciMIVqr
— Farid Khan (@_FaridKhan) December 3, 2023
पाठीवर उचलून नेण्यात आले बाहेर
पाय मुरगळल्यावर शादाब खान तिथेच जमिनीवर झोपला. अशा स्थितीत शादाबला तिथून बाहेर आणण्यासाठी एकही स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. डगआऊटमधून एक ज्युनिअर खेळाडू आला आणि त्याने शादाबला पाठीवर उचलून बाहेर नेण्याचे काम केले. अशात पाकिस्तानी चाहते आणि पत्रकार या व्हिडिओवर सातत्याने संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर शादाबचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधील सद्यस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. (Pakistani Cricketer Shadab Khan Carried Off the Field on Shoulders Due to Lack of Stretcher After Sustaining Injury)
हेही वाचा-
बॉलिंग अशी करा की, रेकॉर्डच झाला पाहिजे! 23 वर्षीय बिश्नोईने केली थेट अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी
ब्रेकिंग! INDvsSA तिन्ही मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने घोषित केला संघ, ‘या’ पठ्ठ्याकडं टीमची धुरा