टी20 विश्वचषक 2022मध्ये पाकिस्तान संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, या संघात माजी कर्णधार शोएब मलिक याची निवड झाली नाहीये. त्यामुळे त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नाराजी व्यक्त केली होती. त्याला ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकासाठी दुर्लक्षित केले गेले होते. असे असले, तरीही अनुभवी मलिकने स्पष्ट केले की, या मोठ्या स्पर्धेत स्थान न मिळाल्याने त्याला कोणतीही समस्या नाहीये. तो मागील झालेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघात सामी झाला होता. मात्र, यावर्षी त्याला हे भाग्य लाभले नाही.
पाकिस्तान संघ मागील काही काळापासून मधल्या फळीतील समस्येचा सामना करत आहे. अशात शोएब मलिक (Shoaib Malik) याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनुभवासोबतच फिटनेस आणि सातत्याने टी20 लीगमध्ये एन्ट्री केल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच त्याने स्पष्ट केले की, त्याला दुर्लक्षित करणे तसेच संघात निवड न होण्यात कोणतीही समस्या नाही. त्याने बाबर आझम (Babar Azam) याच्यासोबतच्या नात्यावरही वक्तव्य केले आहे.
शोएब मलिक याने यासंबंधी पाकिस्तान क्रिकेटशी बोलताना म्हटले की, “जेव्हाही मला संधी मिळेल, तेव्हा खेळणे हेच माझे काम आहे. मला निवडणे किंवा न निवडणे हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. मला जेव्हाही संधी मिळेल, मी याचा पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. मला कोणाशीही समस्या नाही. तसेच, मी कोणाच्याही विरोधात नाहीये. कारण, सकारात्मक असणे माझ्या कारकीर्दीच्या यशामागील एक मोठे कारण आहे.”
हेही वाचा- चाहत्याने ओलांडली हद्द! फोटो घ्यायला आलेल्या पाकिस्तानी खेळाडूसोबत घडलेला प्रकार पाहाच
बाबर आझमसोबतच्या नात्याबद्दल शोएब मलिक म्हणाला की, “आम्ही सातत्याने संपर्कात असतो. आधी आम्ही खूप जास्त बोलायचो, पण तो आता कर्णधार आहे आणि त्याला तो वेळ दिला पाहिजे. मी यामधून गेलो आहे आणि मी त्याच्यावर कोणताही दबाव टाकला नाहीये. तसेच, मी त्याला माझी निवड न झाल्यामुळे समजावण्याचा प्रयत्न करणार नाही.”
भारत- पाकिस्तान सामना
पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना भारताविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या सामन्यासाठी तब्बल 90 हजारांहूनही अधिक तिकीटे विकली गेली आहेत. यावरून या सामन्यासाठी चाहत्यांची असलेली उत्सुकता दिसून येते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पियुष चावलाने पार केला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मैलाचा दगड! गुजरातवर सौराष्ट्रचा मोठा विजय
व्हिडिओ: धवनला न विचारताच वडिलांनी ठरवलं लग्न! वरून लेकालाच मारला जबरदस्त डायलॉग