पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी २००८ ते २०१३च्या काळात सत्तेत असताना मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले होते, असा आरोप पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक झुल्करनैन हैदरने केला आहे. या खेळाडूने २०११मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनल सामन्याचाही उल्लेख केला होता.
एका मुलाखतीत बोलताना, माजी यष्टीरक्षकाने युसूफ रझा गिलानी यांच्यावर ३० मार्च रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध २०११च्या विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना फिक्स केल्याचा आरोप केला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे मोहालीमध्ये भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव केला. सचिन तेंडुलकरला बाद करण्याच्या काही संधी पाकिस्तान संघाने गमावल्याने त्या वेळीही या सामन्याने प्रश्न उपस्थित केले होते. सचिनने या सामन्यात ८५ धावा करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
शाहिद आफ्रिदी पाकिस्तान संघाचा कर्णधार होता आणि पाकिस्तानने १९९९ नंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तथापि, जुल्करनैन २०११च्या विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघाचा भाग नव्हता कारण त्याने आधीच विचित्र परिस्थितीत २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो पुढे म्हणाला की, “माजी मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि आकिब जावेद हे देखील मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले होते, तरीही तो त्यावेळी गप्प राहिला कारण संघाला गंभीर परिणाम भोगावे लागले असते.”
दरम्यान, या सामन्याबद्दल पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी वाढत आहेत परंतु भारतात असे काहीही दिसले नाही. त्या विश्वचषकात भारतीय संघ आपल्या शिखरावर होता आणि फायनलसह जवळपास प्रत्येक सामना खेळला. आणि प्रत्येक सामन्यात बारताने उल्लेखनिय कामगिरी करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे झुल्करनैन हैदर याने केलेल्या आरोपांना जास्त प्राधान्य देण्याचे कारण सध्यातरी दिसत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारे कर्णधार आता आहेत तरी कुठे? एक तर झालायं निवृत्त
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी