क्रिकेटजगतातून धक्कादायक बातमी पुढे आली आहे. आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचे बुधवारी (14 सप्टेंबर) लाहोरमध्ये निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याचे समजत आहे. त्यांचे भाऊ ताहिर रौफ यांनी याबद्दल माहिती दिली आहे. रौफ यांच्या आकस्मिक निधनानंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपले चप्पलांचे दुकान बंद करून घरी जात असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. रौफ यांच्या अचानक जाण्याने क्रिकेटविश्व शोकसागरात बुडाले आहे. क्रिकेटचाहते सोशल मीडियाद्वारे रौफ यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
रौफ 2006 ते 2013 दरम्यान आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिले होते. यादरम्यान त्यांनी 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली होती. 2013 साली बीसीसीआयने बसवलेल्या शोध समितीत मॅच फिक्सिंगच्या आरोपात रौफ दोषी सापडले होते. त्यांनी 2013साली आयपीएल सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याचे समजले होते, ज्यानंतर 2016 साली बीसीसीआयद्वारे त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी लावण्यात आली होती.
Sad to know about the news of former ICC umpire Asad Rauf’s demise…May Allah grant him magfirat and give his family sabr Ameen 🤲🏻🤲🏻 pic.twitter.com/VyplFGX6gT
— Kamran Akmal (@KamiAkmal23) September 14, 2022
रौफ यांनी तब्बल 231 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणुन काम केले आहे. तर ते 2006 ते 2013पर्यंत आयसीसीच्या एलिट पॅनलचे सदस्यदेखील राहिले आहेत. या दरम्यान त्यांनी 64 कसोटी, 139 एकदिवसीय तर 28 टी२० सामन्यात पंचाची भुमिका बजावली होती.
परंतु मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकल्यानंतर त्यांच्यावर चपल्या विकायची वेळ आली होती. ते एक चप्पल बुटांचे दुकान चालवत होते. ते आपल्या स्टाफसाठी हे दुकान चालवत असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले होते, जेणेकरुन त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न भागेल. त्यांचा एक मुलगा दिव्यांग आहे, तर दुसरा मुलगा सध्या अमेरिकेत शिक्षण घेऊन परत मायदेशी परतला आहे. ते आपल्या बायकोसोबत आणि त्यांच्या दोन्ही मुलांसोबत राहत होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पंचाचे आकस्मिक निधन, क्रिकेटविश्व शोकसागरात
शाहिद आफ्रिदीचे खळबळजनक वक्तव्य! म्हटला, विराटसाठी हीच योग्य वेळ आहे त्याने…
‘हा’ फलंदाज बनणार भारताचा नवा ‘एमएस धोनी’, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया