भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानात खेळायला यायचा, तेव्हा त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह पाहण्यासाठी चाहते वाट पाहायचे. सध्या भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ हे फलंदाजही सचिनप्रमाणे स्ट्रेट ड्राईव्ह खेळू शकतात. आता पाकिस्तानची एका महिला खेळाडू सिदरा अमीननेही एक उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह खेळला आहे, ज्याची तुलना सचिन तेंडुलकरची ओळख असलेल्या स्ट्रेट ड्राईव्हशी होत आहे.
सध्या न्यूझीलंडमध्ये केळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत हा शॉट खेळला गेला आहे. शुक्रवारी (२४ मार्च) विश्वचषक स्पर्धेतील २४ व्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड (England W vs Pakistan W) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने ९ विकेट्स शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला.
या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी १५ व्या षटकात न्यूझीलंडची नताली शीवर गोलंदाजी करत होती. षटकातील दुसऱ्या चेंडूवर पाकिस्तानची सलामीवीर सिदरा आमीन (Sidra Ameen) हिने एक उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह खेळला.
आमीनने खेळलेल्या या शॉटची तुलना सचिन तेंडुलकच्या स्ट्रेट ड्राईव्हशी होत आहे. आयसीसीने आमीनने खेळलेल्या या स्ट्रेट ड्राईव्हचा व्हिडिओ सोशल मीडियापर पोस्ट केला आहे. आयसीसीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही शॉट कोणाची तरी आठवण करून देत आहे. सचिन तेंडुलकर?” या पोस्टवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CbeCw_1onzy/?utm_source=ig_web_copy_link
पाकिस्तान आणि इंग्लंडमधील या सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडने सोपा विजय मिळवला. पाकिस्तन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१.३ षटकात अवघ्या १०५ धावा केल्या आणि त्यांचा संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या महिला खेळाडूंनी हे सोपे लक्ष्य अवघ्या १९.२ षटकात आणि एका विकेटच्या नुकसानावर गाठले. इंग्लंडची सलामीवीर डॅनियल वॅटने नाबाद ७६ धावा केल्या, तसेच कर्णधार हीदर नाइटने २४ धावांची खेळी केली. या विजायनंतर इंग्लंड संघाच्या उपांत्य सामन्यात पोहचण्याच्या शक्यता अधिक वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आठवण ‘त्या’ सामन्याची, जेव्हा पाकिस्तानने बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत उंचावला होता विश्वचषक
Video: जेव्हा एमएस धोनीने ‘असं’ करत केली होती जडेजाची बत्ती गुल; खुद्द ‘जड्डू’ही झालेला हँग