सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तानमधील ही टी20 लीग फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. भारताची आयपीएल स्पर्धा देखील विश्वविख्यात टी20 लीग आहे. ज्यात प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला खेळण्याची ईच्छा असते. आयपीएल आणि पीएसएल या स्पर्धांची तुलना चाहत्यांद्वारे नेहमी केली जाते. मात्र, पाकिस्तानचा सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यानेही यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्यामते आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जास्त चांगली आहे. पीएसएलमध्ये मुलतान सुलतान्स या संघाचे नेतृत्व करणारा रिझवान आयपीएल आणि पीएसएलची तुलना करत म्हणाला की आयपीएलपेक्षा पीएसएलमधील क्रिकेटची गुणवत्ता जास्त चांगली आहेे. त्याच्यामते पीएसएलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात राखीव खेळाडू असतो आणि विदेशी क्रिकेटरही हे मानतात की पीएसएल सर्वात अवघड लीग आहे.
पीएसएलच्या कार्यक्रमात रिझवान म्हणाला की, “पीएसएलने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे. पीएसएलमध्ये खेळणारे बरेच परदेशी खेळाडू असे मानतात की ही सर्वात कठीण क्रिकेट लीग आहे. बरेच अनुभवी खेळाडू देखील हेच मानतात. बऱ्याच वेळा असे होते धमाकेदार प्रदर्शन करणारे खेळाडूंना देखील पीएसएलमध्ये बेंचवर बसावे लागते.”
पाकिस्तान सुपर लीग 2023साठी खेळाडूंचा ड्राफ्ट समाप्त झाला आहे. पाकिस्तान आणि बाहेरचे देश मिळून 500 खेळाडूंनी या स्पर्धेच्या ड्राफ्टमध्ये आपली नावेे नोंदवली आहेत. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिद (Adil Rashid) मुलतान सुलतान्स या संघात सामील झाला आहे, न्यूझीलंडचा जिमी नीशम (Jimmy Neesham) पेशावर जल्मी संघाकडून खेळताना दिसेल. इस्लामाबाद युनाइटेड या संघाने मोईन अली (Moin Ali) आणि अबरार एहमद (Abrar Ahmed) यांना आपल्या संघात सामील केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्ध भारताची स्थिती भक्कम, दुसऱ्या डावात गिलच्या झंझावाती अर्धशतकाने संघाची आघाडी 400च्या जवळ
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाने केली कसोटीतून निवृत्ती जाहीर, शेवटचा सामना खेळणार इंग्लंडविरुद्ध