पाकिस्तानचे वरिष्ठ क्रिकेट पंच अलीम दार (Alim Dar) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट अंपायरिंगसाठी ओळखले जातात. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. अलीम दार यांनी अलीकडेच त्यांच्या आयुष्याशी निगडीत एक वेदनादायक गोष्ट शेअर केली आहे. एका रिपोर्टनुसार दार यांनी सांगितले आहे की, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या 7 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूची बातमी लपवली होती. दार त्यावेळी एका सामन्यात अंपायरिंग करत होते.
दार यांनी एका पाकिस्तानी शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्ट शेअर केल्या आहेत. ते म्हणाले, “माझ्या अंपायरिंग करिअरची ही सुरुवात होती आणि माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची होती. माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून मी तेथून घरी परतणार हे माझ्या कुटुंबीयांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी त्यावेळी या घटनेचा उल्लेख माझ्यासमोर केला नाही.”
दार 2003 च्या विश्वचषकातील एका सामन्यात अंपायरिंग करत होते. या सामन्यादरम्यान त्यांच्या 7 महिन्यांच्या मुलीने हे जग सोडलेले. दार यांच्या कारकिर्दीची ही फक्त सुरुवात होती. या कारणास्तव त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नवजात मुलीच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली. या घटनेनंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी सांगितले की, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण होता.
अलीम दार यांच्या नावावर अंपायरिंगचे अनेक रेकॉर्ड आहेत. त्यांनी सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. दार यांनी 145 कसोटी सामन्यांमध्ये ही भूमिका बजावली. यासोबतच त्यांनी 231 वनडे आणि 72 टी20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले. दार देशांतर्गत क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू म्हणून देखील खेळले आहेत. त्यांनी 18 लिस्ट ए सामन्यात 15 बळी घेतले आहेत. यासोबतच 179 धावाही केल्या आहेत. दार यांनी प्रथमश्रेणी सामन्यांच्या 24 डावांमध्ये 270 धावा केल्या आहेत. तसेच 11 बळीही टिपले.
हेही वाचा-
सीएएसने अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट, फोटो पाहून तुमचेही हृदय तुटेल
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?