---Advertisement---

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने जाहीर केली निवृत्ती, टीम इंडियाला दिलायं खूप त्रास

On: रविवार, मार्च 15, 2026 4:43 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने रविवारी (१५ मार्च) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या ३८ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाच्या दोन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे. त्याने दोन प्रमुख आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवला आहे.

सरफराजने डिसेंबर २०२३ मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचे शेवटचे कसोटीमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डामार्फत (पीसीबी) जाहीर केलेल्या निवेदनाद्वारे त्याचा निर्णय सांगितला. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपचारिक निवृत्तीच्या घोषणेमुळे अहमदला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची परवाणगी मिळू शकते. मागील वर्षी कसोटी संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना बोर्डाने पुढे न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ही जागा रिक्त आहे.

सरफराजला पाकिस्तान क्रिकेट रचनेत आधीच अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अलिकडेच त्याला राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील संघासाठी मार्गदर्शक आणि व्यवस्थापक म्हणूनही नियुक्त करण्यात आले.

आयसीसीशी बोलताना सरफराजने म्हटले, “पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. २००६ मध्ये १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करण्यापासून ते २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापर्यंत प्रत्येक क्षण खास राहिला आहे. माझ्या कारकिर्दीत माझ्या सहकाऱ्यांनी, प्रशिक्षकांनी, कुटुंबाने आणि चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सरफराजने पाकिस्तानसाठी तिन्ही प्रकारामध्ये ५४ कसोटी, ११७ वनडे आणि ६१ टी२० सामने खेळले. त्याने तिन्ही प्रकारामध्ये एकूण ६१६४ धावा केल्या असूून त्यामध्ये सहा शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टंपच्या मागे त्याने ३१५ झेल घेतले, तर त्याच्या नावावर ५६ स्टंपिंग देखील आहेत.

सरफराजने १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (५० एकदिवसीय, ३७ टी२०, १३ कसोटी) पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि टी२० क्रिकेटमध्ये संघाला पहिल्या क्रमांकावर नेले. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कामगिरी २०१७ मध्ये आली. जेव्हा त्याने इंग्लंडमधील ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताला १८० धावांनी हरवून पाकिस्तानला पहिले आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद मिळवून दिले.

सरफराजने २००६ मध्ये श्रीलंकेत झालेल्या आयसीसी पुरुष अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ३८ धावांनी हरवून पाकिस्तानला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे तो ज्युनियर स्तरावरही यशस्वी कर्णधार होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---