मुंबई । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि संघाचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसचे वडील मोहम्मद युनूस यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांना प्रकृती चिंताजनक स्थितीत लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वकार या दु:खाच्या घटनेत कुटुंबासमवेत नव्हता.
इंग्लंडचा दौरा करून तो थेट ऑस्ट्रेलियाला गेला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या घटनेबद्दल शोक व्यक्त केले आहे. वकारची पत्नी म्हणाली की, “कोरोना व्हायरसच्या या साथीच्या काळात तिच्या कुटुंबासाठी ही कठीण वेळ आहे.”
वकार ऑस्ट्रेलियामध्ये होता
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार, वकार रविवारी रात्री उशिरा लाहोरला पोहोचला. 2 सप्टेंबर रोजी वकार इंग्लंड दौरा संपल्यानंतर थेट सिडनीला गेला होता. तेथील नियमांनुसार, त्याला 9 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. वकार सिडनीमध्ये राहतो. वडिलांच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियन अधिकार्यांनी त्याला क्वारंटाईनमधूनच थेट पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली.
पाकिस्तानचा खतरनाक गोलंदाज
वकार युनूस हा पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमधे सर्वाधिक बळी घेणारा दुसर्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. वसीम अक्रमने 414 बळी घेतले आहेत, तर वकारने 373 बळी घेतले. वनडे सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा वकार हा जगातील तिसरा गोलंदाज आहे. त्याने वनडे 262 सामन्यात 416 बळी घेतले आहेत. वकार हा त्याच्या काळात रिव्हर्स स्विंगचा बादशहा मानला जातो. 2006 मध्ये प्रथमच त्याला पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक बनविण्यात आले. 2014 पासून वकार हा सतत पाकिस्तानी संघासोबत काम पहात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल समालोचकांच्या यादीतून दिग्गजाला वगळले, आता हर्षा भोगलेसह फक्त…
-बंदे मे दम है! ‘त्या’ सामन्यात विराटला खेळताना पाहून मुंबईचा कर्णधार झाला होता अवाक्
-आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा
ट्रेंडिंग लेख-
-‘त्या’ भावासाठी धावून आली बहीण! आता आयपीएल गाजवून देणार भाऊबीजेची खास भेट
-फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११
-सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला