---Advertisement---

पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा; सहकाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन दिला निरोप, पहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 11, 2023 6:21 PM
Asad Shafiq
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. येथे 14 डिसेंबरपासून संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. दरम्यान, पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज असद शफीक याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. असद बराच काळ संघाबाहेर होता. नॅशनल टी20 चषकात कराची संघाकडून तो शेवटचा सामना खेळला.

या स्पर्धेत असद शफिक (Asad Shafiq) याला त्याच्या संघातील खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यांच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असद भावूक दिसत आहे. निवृत्तीबद्दल बोलताना असद म्हणाला,”माझ्यामध्ये क्रिकेट खेळण्याचा पूर्वीसारखा उत्साह आणि आवड राहिलेली नाही. माझ्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्याची तंदुरुस्तीही नाही. त्यामुळे मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करार मिळाला आहे आणि मी त्याकडे लक्ष देत आहे आणि मला आशा आहे की, त्यावर लवकरच निर्णय होईल.”

वृत्तानुसार, निवृत्तीनंतर असद शफीक लवकरच पाकिस्तान संघाच्या निवड समितीमध्ये दिसू शकतो. पाकिस्तानच्या या होतकरू खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, असद शफीकला कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक यश मिळाले. त्याने आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 77 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात कसोटीत त्याने 12 शतके आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 4660 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात 9 अर्धशतकांच्या मदतीने 1336 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 192 धावा केल्या आहेत.

मात्र, तो नॅशनल टी20 चषकाच्या अंतिम सामन्यात फार काही करू शकला नाही आणि अवघ्या 4 धावा करून बाद झाला. असे असूनही त्याच्या संघाने सामना 9 धावांनी जिंकला आणि विजेतेपदासह त्याला निरोप दिला. (Pakistan’s leading batsman bids farewell to cricket Colleagues bid farewell with a guard of honour watch the video)

महत्वाच्या बातम्या

RCBने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड? ज्या खेळाडूला काढलं बाहेर, त्याने शतक ठोकून दिले सडेतोड उत्तर
मिचेल मार्श घेणार डेव्हिड वॉर्नरची जागा? ‘या’ खेळाडूला आदर्श मानत म्हणाला, ‘एक माणूस जो…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---