मुंबई । इंग्लंडमध्ये जर आकाश ढगाळ असेल आणि खेळपट्टीवर ओलावा असेल तर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजालाही क्रीजवर रहाणे अवघड होते. यातच जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड सारख्या गोलंदाजांसमोर फलंदाजांना बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु पाकिस्तानचा सलामीवीर शान मसूद केवळ मँचेस्टर कसोटीत केवळ टिकलाच नाही तर त्याने पहिल्या दिवशी 46 धावा करत एक विक्रम ही आपल्या नावे केला आहे.
मॅनचेस्टर कसोटीत शान मसूदने 100 हून अधिक चेंडू खेळले आहेत आणि यासह त्याने एक खास विक्रम केला आहे. गेल्या 4 वर्षात म्हणजेच 2016 नंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटीच्या पहिल्या डावात 100 हून अधिक चेंडू खेळणारा मसूद पहिला सलामीवीर आहे. दुसर्या कोणत्याही सलामीवीरला गेल्या चार वर्षात हा कारनामा करता आला नाही.
शॉन मसूदच्या अगोदर वेस्ट इंडीजचा सलामीवीर कायरेन पॉवेलने लॉर्ड्स कसोटीत 98 चेंडू खेळला. डेव्हिड वॉर्नरने गेल्या वर्षी लीड्स कसोटीमध्ये 94 चेंडू तर शिखर धवनने भारताकडून 65 चेंडू खेळले होते.
कालपासून(5 ऑगस्ट) सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 16 व्या षटकपर्यंत आबिद अली आणि कर्णधार अझर अलीची विकेट गमावली होती, परंतु त्यानंतर शान मसूदने बाबर आझमबरोबर अर्धशतकी भागीदारी रचली. बाबर आझमने अर्धशतक ठोकले. शान त्याच्या अर्धशतकापासून अवघ्या 5 धावा दूर होता. पण यानंतर पाऊस पडला आणि खेळ पहिल्या दिवशी थांबवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया
विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर