पुणे (13 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 आज नववा दिवस होता. काळ पासून ‘ब’ गटातील लढतीना सुरुवात झाली आहे. पालघर व नंदुरबार या संघांनी संघाने सलग दुसरा विजय मिळवला. तर सांगली व नाशिक संघाने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
आज झालेल्या पहिल्या लढतीत नंदुरबार संघाने सातारा संघा विरुद्ध रोमहर्षक विजय संपादन केला. सुरुवातीपासून सातारा संघ आघाडी होता पण उत्तरार्धात नंदुरबार संघाने पलटवार करत सामना 31-27 असा जिंकला. नंदुरबारचा जयेश महाजन विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने चढाईत 11 गुणांसह पकडीत 1 गुण मिळवला. तर श्रेयस उमरदंड जे उत्कृष्ट पकडी करत महत्वाची भूमिका निभावली. आजच्या दुसऱ्या सामन्यात पालघर संघाने कोल्हापूर संघावर 27-22 असा विजय मिळवला. पालघरचा यश निंबाळकर ने महत्वपूर्ण 12 गुण मिळवले. तर जीत पाटील ने 6 पकडी केल्या.
तिसऱ्या सामन्यात सांगली संघाने लातूर संघावर मात देत पहिला विजय मिळवला. सुरुवातीला चुरशीच्या झालेल्या ह्या सामन्यात सांगली संघाने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत सामना 49-32 असा जिंकला. सांगलीच्या अभिषेक गुंगेने महत्वपूर्ण खेळी केली. तर आजच्या चौथ्या सामन्यात नाशिक संघाने 51-19 असा धाराशिव संघाचा धुव्वा उडवला. ईश्वर पाथाडेच्या खेळीने सामना एकतर्फी झाला.
संक्षिप्त निकाल-
नंदुरबार जिल्हा 31 – सातारा जिल्हा 27
कोल्हापूर जिल्हा 22 – पालघर जिल्हा 27
सांगली जिल्हा 49 – लातूर जिल्हा 32
नाशिक जिल्हा 51 – धाराशिव जिल्हा 19
महत्वाच्या बातम्या –
अटीतटीच्या लढतीत नंदुरबार संघाचा सातारा संघावर विजय
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पालघर संघाचा सलग दुसरा विजय