भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात, पंतने जेव्हा 40 धावा पूर्ण केल्या, त्यानंतर तो भारताकडून WTC इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
पंतने आतापर्यंत दोन WTC चक्रा (2019-2025) मध्ये एकूण 2717 धावा केल्या आहेत आणि यामुळे त्याने कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) विक्रम मागे टाकला आहे, ज्याच्याकडे याआधी 2717 धावा होत्या.
दुखापत झालेली असूनही पंतने मैदानात उतरून जबरदस्त धैर्य दाखवलं. त्याने केवळ 69 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं आणि आपल्या 54 धावांच्या खेळीत 3 चौकार व 2 षटकार ठोकले. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पंतने 4 कसोटी सामन्यांतील 7 डावांत 68.43 च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत.






