भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्याने नुकताच पार पडलेला ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजवला आहे. त्यानंतर त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यानंतर ऑस्ट्रेलियावरुन परतल्यानंतर तो सध्या त्याच्या सोशल मीडियावरील गमतीशीर पोस्टमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
रिषभने गुरुवारी(२८ जानेवारी) एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की ‘जेव्हापासून ऑस्ट्रेलियावरुन परत आलो आहे, तेव्हापासून घरातले लोक मागे लागले आहेत की घर घे आता. गुरगाव योग्य असेल का? अजून कोणता पर्याय असेल तर सांगा.’
Jabse Australia se aaya hoon gharwale peeche pade hain ki naya ghar le lo ab. Gurgaon sahi rahega? Aur koi option hai toh batao.
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 28, 2021
रिषभच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका ट्विटरकर्त्याने त्याला गमतीने म्हटले आहे की ‘गॅबावर पझेजश मिळाले का? ते योग्य राहिल.’ तर काहींनी त्याला विविध पर्याय दिले आहेत. काहींनी त्याला हैदराबाद, काहींनी मुंबई, नोएडा असे अनेक पर्याय दिले आहेत. तर काहींनी त्याला गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Gabba ka possession mil gaya? Badiya rahega.
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) January 28, 2021
Hyderabad aajao , Hyderabad me kphb accha rahega
— nav (@SlMHADRl) January 28, 2021
https://twitter.com/AndColorPockeT/status/1354688049351806977
I can guarantee that even kohli and rohit doesnt have guts to ask this question on twitter🤣
— Bleed blue (@Prana30060168) January 28, 2021
bhai, IPL mein Gurgaon Gorillas team banane ka plan hai kya?
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) January 28, 2021
aap ghaziabad aajao aapki personality se bhi match karega
— k (@hoekayyyyy) January 28, 2021
Mumbai aa jao 😅😅😅
— Anuruddh Tripathi (@anuruddhtri3) January 28, 2021
Chandigarh.
— Ujala 🌸 (@WhereIsMy_Food) January 28, 2021
काहीदिवसांपूर्वीच रिषभने टॉम या कार्टूनचे चित्र असलेला टी-शर्ट घालून फोटो पोस्ट केला होता. तसेच विचारले होते की त्याच्या टी-शर्टवर असलेल्या कार्टून कितीजणांनी पाहिले आहे. यावरही त्याला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
How many of you have watched this cartoon on my T-shirt 😅🤣😂 ? #17 pic.twitter.com/9m9eyrlblp
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 24, 2021
रिषभची ऑस्ट्रेलियातील कामगिरी –
रिषभला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र त्याला कसोटी संघात जागा मिळाली होती. त्याने या दौऱ्यात ३ कसोटी सामन्यात खेळताना ६८.५० च्या सरासरीने २७४ धावा केल्या होत्या. यात त्याने सिडनी कसोटीत केलेल्या ९७ धावांच्या आणि ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियमवर केलल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्याच्या या दोन खेळी भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाच्या ठरल्या होत्या. तसेच तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो”, मोहम्मद शमीची वडिलांसाठी भावूक पोस्ट
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीचे चेन्नईत आगमन; फोटो व्हायरल
महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक