---Advertisement---

“५०-६० कसोटी खेळल्यानंतरच रिषभची दिग्गजांशी तुलना होईल’

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 9:44 PM
rishabh-pant-keepimg
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (ricky ponting) याच्या मते रिषभ पंत (rishabh pant) आणि ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक फलंदाज एडम गिलख्रिस्ट (adam gilchrist) यांच्यातील आक्रमकता एकसारखी आहे. या दोन यष्टीरक्षक फलंदाजांची यापूर्वी अनेकदा तुलना केली गेली आहे. परंतु या दोघांची तुलना तेव्हाच होऊ शकते, जेव्हा रिषभ पंत भारतासाठी किमान ५०-६० कसोटी सामने खेळेल. पॉंटिंगने ‘ए आयसीसी रिव्यू’ ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले आहे.

पॉटिंग यावेळी म्हणाला की, “होय, त्यांच्यात थोडी समानता आहे. परंतु सर्वकालीन महान यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एकाशी तुलना सुरू करण्यापूर्वी त्याला कमीत कमी ५०-६० कसोटी सामने खेळावे लागतील.” गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या कारकिर्दीत ९६ कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये ४७.६ च्या सरासरीने ५५७० धावा केल्या. तसेच त्याने २८७ एकदिवसीय सामन्यातही संघाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ३५.८९ च्या सरासरीने धावा केल्या. रिषभ पंतची कारकीर्द तुलनेने लहान आहे. पंतने आतापर्यंत भारतासाठी २८ कसोटी, २३ एकदिवसीय आणि ४१ टी-२० सामने खेळले आहेत.

पॉंटिंग पुढे बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर रिषभ पंत बहिर्मुखी आहे. तो जास्त मोठ्याने बोलतो आणि चुळबुळ करतो. तसेच तो खूप स्पर्धात्मक आहे. गिलख्रिस्ट ही अतिस्पर्धात्मक होता. पण खूप शांत आणि अंतर्मुखी होता. परंतु जेव्हा त्याच्या हातात बॅट यायची, तेव्हा तो एकदम रिषभसारखाच बनायचा.” पॉंटिंग आणि गिलख्रिस्ट एकत्र खेळले आहेत. पॉंटिंग त्यावेळी कर्णधारही होता. पंत आणि पॉंटिंगनेही एकत्र काम केले आहे. मागच्या हंगामात पॉंटिंग दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक होता आणि पंत संघाचा कर्णधार होता.

पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायवाडच्या गुणवत्तेवर प्रभावित झाला पॉंटिंग

पॉंटिंग मागच्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभाग घेत आला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवा खेळाडूंची गुणवत्ता पाहून पॉंटिंग खूपच प्रभावित झाला आहे. तो पुढे म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर पृथ्वी शॉला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. त्याने मागच्या हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. मला अजूनही वाटते की, तो एका व्यक्ती आणि खेळाडूच्या रूपात स्वतःविषयी खूप काही शिकत आहे.” त्याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडचेही त्याने कौतुक केले. त्याच्या मते ऋतुराज लवकरच भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारांमध्ये खेळेल.

महत्वाच्या बातम्या –

‘त्याला फक्त थोड्या नशिबाची गरज आहे’; दिग्गजाने केली विराटची पाठराखण

एचपी रॉयल्स, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी आगेकूच

प्रथमच आयपीएल लिलावात नसणार पंजाबची ‘प्रीती’; ट्विटरवर माहित देत लिहिले…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---