---Advertisement---

पृथ्वी शॉची दमदार कॅप्टन्सी; जिंकले टी२० मुंबई लीगचे विजेतेपद

On: सोमवार, मे 27, 2019 11:01 AM
---Advertisement---

मुंबई। रविवारी(26 मे) वानखेडे स्टेडियमवर पृथ्वी शॉ कर्णधार असलेल्या नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने टी20  मुंबई लीगच्या दुसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवले आहे. सोबो सुपरसोनिक्स संघाविरुद्ध पार पडलेल्या अंतिम सामन्यात पँथर्सने 12 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात पँथर्स संघाला सुपरसोनिक्सने प्रथम गोलंदाजी करताना 143 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. परंतू नंतर पँथर्सच्या गोलंदाजीसमोर 144 या धावसंख्येचा पाठलाग करण्यात मात्र सुपरसोनिक्सला अपयश आले. पँथर्सच्या गोलंदाजांनी सुपर सोनिक्सला 19.4 षटकात 131 धावांतच सर्वबाद केले.

सुपरसोनिक्सकडून फक्त पराग खानापूरकरने चांगली लढत दिली. त्याने 43 धावांची खेळी केली. मात्र अन्य फलंदाज खास काही करु शकले नाही. पँथर्सकडून अतिफ अत्तरवाला आणि प्रथमेश डाके यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच लीगमधील सर्वात वयस्कर खेळाडू प्रविण तांबेने 2 विकेट घेतल्या आणि राहुल सावंतने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, पँथर्सने पृथ्वी शॉच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 143 धावा केल्या होत्या. पँथर्सने पहिल्या 6 षटकातच 4 विकेट गमावल्या होत्या. पण शॉने संघाचा डाव सावरताना शशिकांत कदमबरोबर 5 व्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.

त्याचबरोबर शॉने अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 55 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 61 धावा केल्या. शॉला चांगली साथ देणाऱ्या शशिकांतने 37 धावांची खेळी केली.

सुपरसोनिक्सकडून दिपक शेट्टीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ध्रुमिल मटकर आणि रोहन राजेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात पँथर्सकडून 3 विकेट घेणाऱ्या अतिफ अत्तरवालाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर 12 दिवस चाललेल्या या लीगमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या शॉला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. शॉने 6 सामन्यात 49.80 च्या सरासरीने 249 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतकी खेळी केलेल्या जडेजाने भारतीय फलंदाजीबद्दल केले मोठे वक्तव्य

विश्वचषकामध्ये बांगालादेश हिरव्या जर्सीबरोबरच या नवीन जर्सीतही दिसणार खेळताना

पहिल्या सराव सामन्यात यष्टीरक्षक नाही तर क्षेत्रकक्षक झाला धोनी, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment