---Advertisement---

IND vs ENG: ड्रेसिंग रूममध्ये रिषभ पंतवर प्रेमाचा वर्षाव, तुफानी खेळीने मुख्य प्रशिक्षक खुश!

On: शनिवार, जून 21, 2025 4:49 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने (Rishbh Pant) शानदार पद्धतीने फलंदाजी करत एकापेक्षा एक शानदार शॉट्स झळकावले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. रिषभ पंत 65 धावा करून नाबाद आहे. उपकर्णधाराच्या या शानदार खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याच्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

ड्रेसिंग रूम मधील बाकीच्या खेळाडूंनी रिषभ पंत आणि शुबमन गिलसाठी (Shubman gill) जोरदार टाळ्या वाजवल्या. तसेच के एल राहुल (KL Rahul) रिषभ समोर दोन्ही हात जोडून उभा दिसला. आत गेल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी प्रशिक्षक आणि नंतर गौतम गंभीर (Gautam gambhir) यांनी रिषभला मिठी मारत खूप शाबासकी दिली. बीसीसीआयने याचा व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवर शेअर केलेला आहे.

त्याचबरोबर विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) वेळेनुसार त्याच्या खेळामध्ये चांगला बदल घडवताना दिसत आहे. त्याने सावधानीने खेळत भारतीय संघाला हळूहळू पुढे नेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---