आयपीएल 2025 पूर्वी 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं संघात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. फ्रॅन्चाईजीनं नुकतीच महेला जयवर्धने यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी मार्क बाऊचरकडून ही जबाबदारी घेतली. त्यानंतर आता संघानं गोलंदाजी प्रशिक्षक देखील बदलला आहे.
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 पूर्वी पारस म्हांब्रे यांची नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. ते लसिथ मलिंगा याच्यासोबत ही जबाबदारी सांभाळतील. म्हांब्रे यापूर्वी राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. 2024 टी20 विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. यानंतर आता ते मुंबई इंडियन्सशी जोडले गेले आहेत.
पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी मुंबई इंडियन्सनं आपल्या अधिकृत वेबसाइटवरून दिली. विशेष म्हणजे, पारस म्हांब्रे यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे भाग होते. ते मुंबईसाठी देशांतर्गत सामन्यांमध्ये रिम-आर्म मध्यम वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावत असे.
पारस म्हांब्रे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द छोटेखानी राहिली. त्यांनी टीम इंडियासाठी 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 284 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्यांनी 105 डावात 1665 धावा देखील केल्या आहेत. पारस म्हांब्रे यांनी 83 लिस्ट ए सामन्यात 111 विकेट घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानी राहिला होता. तसेच आता संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील साथ सोडून जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर आता फ्रॅच्याईजीनं अनेक मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. मुंबईनं पुढच्या हंगामापूर्वी महेला जयवर्धनेला यांची पुन्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर आता पारस म्हांब्रे यांना आपल्या सोबत जोडलं.
हेही वाचा –
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!
आपल्याच खेळाडूच्या कानशीलात लगावली, या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं तत्काळ निलंबन!
“मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे”, आयपीएल सुपरस्टारचं मोठं व्यक्तव्य