भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले असून मालिका १-१ ने बरोबरीत आहे. दरम्यान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांब्रे यांनी म्हटले आहे की, वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेली टी२० मालिका संघ व्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी गोलंदाजी आक्रमण निश्चित करायला मदत करेल.
भारतीय संघाच्या (Team India) गोलंदाजी फळीत (Bowling Line Up) सातत्याने होत असलेल्या प्रयोगांबद्दल बोलताना महांब्रे (Paras Mhambrey) म्हणाले की, “हा टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) आमच्या तयारीचा एक भाग आहे. आता आम्ही नानाविध पर्यायांवर विचार करत आहोत आणि युवा खेळाडूंना संधी देत आहे. जेणेकरून आम्हाला समजेल की, कोणता खेळाडू उपयोगी आहे, कोणता नाही. अशाप्रकारे योजना बनवणे सोपे जाते.”
महांब्रेंनी आवेश खान आणि अर्शदीप सिंगसारख्या युवा वेगवान गोलंदाजांसहित अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “या गोलंदाजांनी त्यांच्यातील क्षमता दाखवल्याने मी खूप खुश आहे. मागील २ सामन्यात अर्शदीप आणि आवेशने दबावाच्या परिस्थितीत चांगले प्रदर्शन करत त्यांच्यातील क्षमतेला सिद्ध केल्याने मी आनंदी आहे. तसेच त्यांना दररोज काही-ना-काही शिकायचे आहे आणि आपल्या खेळात सुधारणा करायच्या आहेत. त्यांच्यातील या जिद्दीशी मी खूप प्रभावित आहे.”
“आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंसोबत वेगळ्या प्रकारच्या (Team India Future Plan) रणनिती आजमावत आहोत. आमच्याकडे जसप्रीत बुमराह आहे, जो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत नाहीय. आमच्याकडे मोहम्मद शमीदेखील आहे. परंतु मी वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका युवा गोलंदाजांना स्वतला सिद्ध करण्यासाठीती संधी म्हणून पाहात आहे”, असे पुढे महांब्रे म्हणाले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात २६ धावा देत १ विकेट घेणाऱ्या अर्शदीपची महांब्रेंनी तोंडभरून प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, मी दीर्घ काळापासून, विशेषकरून आयपीएलपासून त्याच्या प्रदर्शनावर नजर ठेवून आहे. त्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, तो दबावाच्या परिस्थितीतही चांगले प्रदर्शन करतो. तो पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्येही कमालीची गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO | धोनीची बरोबरी करायला निघालेला कॅरेबियन फलंदाज, अर्शदीपने उडवल्या दांड्या
विराट कोहली परतल्यानंतर ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, माजी दिग्गजाने स्पष्ट केले कारण
टी२०मध्ये मॅकॉय तर वनडे अन् टेस्टमध्ये ‘या’ गोलंदाजांनी भारतावर आणलेली गुडघे टेकायची वेळ