भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय खराब काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सातत्याने अपयशी होताना दिसतोय. त्यामुळेच त्याच्यावर माजी क्रिकेटपटू तसेच चाहते देखील टीका करतायेत. मात्र, आता त्याच्या संघातील स्थानाविषयी व खेळण्याच्या शैलीविषयी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
रिषभ हा मागील बऱ्याच काळापासून सातत्याने अपयशी ठरत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. टी20 विश्वचषकातही दोन सामन्यात त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. तर, या दौऱ्यावरील टी20 व वनडे अशा दोन्ही मालिकांमध्ये त्याची बॅट थंडावलेलीच आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच्या पत्रकार परिषदेत बोलताना रिषभविषयी म्हणाले,
“आम्ही रिषभसोबत फारसे काही बोलत नाही. कारण, त्याची खेळाची एक वेगळी शैली आहे. कसोटी संघातील त्याच्या जागेविषयी त्याला योग्यरीत्या माहीत असून, त्याला त्याच्या खेळाची देखील जाणीव आहे.”
म्हांब्रे यांनी याच पत्रकार परिषदेत भारतीय संघाला जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची कमतरता जाणवणार असल्याची देखील कबुली दिली.
पंतला आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. मात्र, यावर्षी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी कमालीची घसरलेली आहे. पंत हा अपयशी ठरत असल्याने त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी वारंवार होतेय. पंतमुळे चांगली कामगिरी केल्यानंतर ही संजू सॅमसन याला बाकावर बसावे लागत असल्याचे दिसून येते. सततच्या या खराब कामगिरीमुळे पंत अनेक माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर देखील आला आहे.
(Paras Mhambrey Talk About Rishabh Pant Before Bangladesh Test)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गंभीरने असे काय लिहिले, ज्यावर भलतेच भडकलेत नेटकरी
IPL 2023: ‘मिनी ऑक्शन’साठी अंतिम यादी तयार! इतक्या खेळाडूंवर लागणार बोली; इंग्लंडचा उत्स्फूर्त प्रतिसाद