परभणी पांचाला प्राईड विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात दुसरी लढत झाली. परभणी च्या प्रसाद रुद्राक्ष याने पहिल्या चढाईतच सुपर रेड करत संघाला 3-0 आघाडी मिळवून दिली. प्रसाद ने आक्रमक खेळ करत चढाईत गुण मिळवले. मध्यंतरापर्यत परभणी संघाने धुळे संघावर लोन पाडत 23-10 अशी आघाडी घेतली होती.
प्रसाद रुद्राक्ष ने सुपर टेन पूर्ण करत संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. राहुल घांडगे ने जबरदस्त पकडी केल्या. मध्यंतरा नंतरही परभणीचा खेळ आक्रमक खेळ सुरूच होता. धुळे कडून मितेश कदम एकाकी झुंज देत होता. परभणी संघाने 38-23 असा एकतर्फी विजय मिळवला.
परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष ने सर्वाधिक 13 गुण मिळवले. तर राहुल खांडगे ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 2 तर पकडीत 9 गुण मिळवत हाय फाय पूर्ण केला. धुळ्या कडुन मितेश कदम ने 7 गुण मिळवले तर राकेश पाटील ने 5 पकडी करत हाय फाय पूर्ण केला.
बेस्ट रेडर- प्रसाद रुद्राक्ष, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेंडर्स- राहुल खांडगे , परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- राकेश पाटील, धुळे चोला वीरांस
(Parbhani Panchala Pride defeated Dhule Chola Veerans team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स मधील अटीतटीच्या लढतीत नांदेड विजयी
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा सलग दुसरा विजय