के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज 6 एप्रिल 2023 रोजी ‘ब’ गटाच्या लढतीना सुरुवात झाली. नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात पहिली लढत झाली. परभणी संघाने चांगला खेळ करत नाशिक संघावर लोन पाडला. परभणीच्या राहुल घांडगे ने अष्टपैलू खेळ करत संघाला 19-9 अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरा नंतर दोन्ही संघाच्या मध्ये चांगला खेळ सुरू होता. त्यानंतर मात्र परभणी पांचाला प्राईडच्या डिफेन्स जबरदस्त खेळ करत नाशिक संघावर लोन पाडला. राहुल घांडगे, उद्देश बोचरे व वैभव कांबळे यांनी चांगल्या पकडी करत संघाची आघाडी मजबूत केली.
परभणीच्या मुन्ना शेख ने चढाईत सर्वाधिक 9 गुण मिळवत महत्वाची भूमिका निभावली. राहुल घांडगे ने 5 पकडी, उद्देश बोचरे ने 3 तर वैभव कांबळे ने 3 पकडी केल्या. परभणी संघाने 40-21 असा विजय मिळवत स्पर्धेत सुरुवात केली. नाशिक कडून गणेश गीते ने 7 गुण मिळवत एकाकी झुंज दिली.
बेस्ट रेडर- मुन्ना शेख, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेडर्स- राहुल घांडगे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- राहुल घांडगे, परभणी पांचाला प्राईड
(Parbhani Panchala Pride team’s winning debut in Group ‘B’)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कित्येक अफगाणी आयपीएल खेळले, पण ‘ही’ कामगिरी फक्त गुरबाजलाच जमली, तुम्हीही कराल कौतुक
स्टार फलंदाजाला समजली अश्विनची ताकद, कॅरम बॉलने ऑफ स्टंप्स थेट उडवला