Loading...

परदीप नरवालने केला विक्रमचा ट्रिपल धमाका

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना झाला. पटनाचा सीजन ७ मधील हा शेवटचा सामना होता.

Loading...

या सामन्यात पटनाने ६९-४१ असा विजय मिळवत शेवट चांगला केला. पण त्याचबरोबर सीजनमधील शेवटचा सामना खेळताना कर्णधार परदीप नरवालने आपल्या नावावर आणखी काही विक्रमही केले.

यासामन्यात प्रदीप नारवालने ३४ रेड गुण तर २ टॅकल गुण मिळवत एकूण ३६ गुण मिळवले आणि स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. सीजन ५ मध्ये प्रदीप नरवालने हरियाना स्टीलर्स विरुद्ध ३४ गुण मिळवले होते. त्या सामन्यात परदीपने सर्व ३४ गुण रेडमध्ये मिळवले होते. त्यामुळे एकाच सामन्यांत ३४ रेड गुण मिळवण्याची प्रदीपची कालची दुसरी वेळ ठरली.

Loading...
Loading...

प्रो कबड्डीच्या एक सामन्यांत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम पवन कुमार शेरावतच्या नावावर आहे. त्याने सीजन ७ मध्ये हरियाणा स्टीलर्स विरुद्ध खेळताना ३९ गुण मिळवले होते.

याबरोबर काल पार पडलेल्या सामन्यादरम्यान परदीपने एकाच रेडमध्ये ६ गुण मिळवत आणखी एक पराक्रम केला. सीजन ७ मध्ये एका रेडमध्ये मिळवलेले हे सर्वाधिक गुण आहेत. प्रो कबड्डीच्या इतिहासात याआधी सीजन ५ मध्ये एकाच रेडमध्ये परदीपनेच हरियाना स्टीलर्स विरुद्ध ६ गुण मिळवले होते.

सीजन ७ च्या पटनाच्या शेवटचा सामन्यांत परदीपने ३४ रेड गुणांसह सीजन ७ मध्ये ३०० रेड गुणांचा टप्पा पार केला. या सीजनमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडु ठरला. एकाच सीजन मध्ये ३०० पेक्षा जास्त रेड गुण मिळवण्याची ही परदीपची ही दुसरी वेळ ठरली. याआधी सीजन ५ मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती.

#प्रो कबड्डीत एकाच सामन्यांत सर्वाधिक रेड गुण मिळवणारे खेळाडु-

३९ रेड गुण- पवन शेरावत विरुद्ध हरियाना स्टीलर्स (सीजन ७)

३४* रेड गुण- परदीप नरवाल विरुद्ध बंगाल वॉरियर्स (सीजन ७)

३४ रेड गुण- परदीप कुमार विरुद्ध हरियाना स्टीलर्स (सीजन ५)

३० रेड गुण- रोहित कुमार विरुद्ध यूपी योद्धा (सीजन ५)

#प्रो कबड्डी एका रेड मध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडु –

६ रेड गुण- परदीप नरवाल विरुद्ध हरियाना स्टीलर्स (सीजन ५)

६* रेड गुण- परदीप नरवाल विरुद्ध बंगाल वॉरियर्स (सीजन ७)

#प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये सर्वाधिक रेड गुण मिळवणारे खेळाडु.

३०२ रेड गुण – परदीप नरवाल

२९५ रेड गुण – पवन कुमार शेरावत

२५६ रेड गुण – नवीन कुमार

२०५ रेड गुण – मनिंदर सिंग

१८९ रेड गुण- सिद्धार्थ देसाई

#प्रो कबड्डीत दोन सीजन मध्ये ३०० पेक्षा जास्त रेड गुण –

परदीप नरवाल – ३६९ (सीजन ५), ३०२ (सीजन ७)

Loading...
You might also like