सध्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) सुरु आहे. त्यामध्ये टेबल टेनिस स्पर्धेत महिला संघाचा बुधवारी (7 ऑगस्ट) रोजी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून पराभव झाला. मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाला रिओ 2016 रौप्यपदक विजेत्या जर्मनीकडून 1-3 ने पराभव पत्करावा लागला.
जर्मनीविरुद्ध भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत, अर्चना कामथने दुहेरीच्या लढतीत श्रीजा अकुलाशी झुंज दिली. या जोडीला जर्मन जोडी युआन वान आणि शान झियाओना यांच्याकडून 1-3 (5-11, 11-8, 10-12, 6-11) असा पराभव पत्करावा लागला. 25व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बत्राचा एकेरी सामन्यात 100व्या क्रमांकावर असलेल्या ऍनेट कॉफमननं पराभव केला. मनिकानं पहिला गेम जिंकला, परंतू 18 वर्षीय कॉफमननं 3-1 (11-8, 5-11, 7-11, 5-11) असा सामना जिंकला.
123व्या क्रमांकावर असलेल्या अर्चना कामथनं सध्या जागतिक क्रमवारीत 40व्या क्रमांकावर असलेल्या शॉन जिओनाविरुद्ध विजय मिळवून भारताला सामन्यात परत आणलं. अर्चनानं तिच्या उच्च मानांकित प्रतिस्पर्ध्याचा 3-1 (19-17, 1-11, 11-5, 11-9) असा पराभव केला आणि सामना चौथ्या सामन्यात पोहोचवला.
परंतू, ऍनेट कॉफमननं केलेल्या चमकदार कामगिरीमुळे चौथ्या सामन्यात जर्मनीनं विजय मिळवला. कॉफमननं जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानी असलेल्या श्रीजा अकुलाचा 3-0 (7-11, 7-11, 7-11) असा सरळ गेममध्ये पराभव करुन आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पण सामन्यात पहिली विकेट घेताच परागच्या नावावर ‘हा’ शानदार रेकाॅर्ड
INDvsSL: फर्नांडोचं झंझावाती अर्धशतक, निर्णायक सामन्यात भारतासमोर 249 धावांचं आव्हान
विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर, आता ही कुस्तीपटू खेळणार अंतिम सामना; पराभवानंतरही लागली लॉटरी