भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो या मैदानावर खेळला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामधील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील हा अंतिम सामना आहे. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी तिसऱ्या सामन्यात श्रीलंकनं कर्णदार चरिथ असलंकानं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
श्रीलंकेसाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीरांनी जोरदार सुरुवात करुन दिली. पाथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांनी चमकदार फलंदाजी केली. पाथुम निसांका (45) धावांवरती बाद झाला. तर फर्नांडोनं श्रीलंकेसाठी सर्वाधिक (96) धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. यष्टीरक्षक कुसल मेंडिसनं 82 चेंडूत (59) धावांची खेळी केली. त्यावर श्रीलंकेनं 7 गडी गमावून 248 धावा केल्या.
भारतासाठी गोलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा रियान परागनं धमाकेदार गोलंदाजी करत सर्वाधित 3 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. फिरकीपटू अक्षक पटेल, कुलदीप यादव, वाॅशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 1 विकेट घेण्यात यशस्वी झाला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महेश थीक्ष्णा, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL: पंतच्या पुनरागमनानं चाहते खुश, तर केएल राहुलची उडवली थट्टा
विनेश फोगटला अपात्र ठरवणारा कुस्तीचा नियम काय आहे? पैलवानाचं वजन कसं केलं जातं? जाणून घ्या
IND vs SL: एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर रियान पराग भावूक म्हणाला…