---Advertisement---

IND vs SL: पंतच्या पुनरागमनानं चाहते खुश, तर केएल राहुलची उडवली थट्टा

Kl-Rahul-And-Rishabh-Pant
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारी (2 ऑगस्ट) रोजी सुरुवात झाली होती. आज (7 ऑगस्ट) 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना कोलंबो मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटतटीची लढत पाहायला मिळाली. हा सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. आज (7 ऑगस्ट) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं केएल राहुलच्या जागी रिषभ पंतला सघात संधी दिली आहे.

पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात पंत तंबूत बसून होता. भारतीय संघात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत केएल राहुल (KL Rahul) होता. केएल राहुल दोन्ही एकदिवसीय सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. तो दोन्ही सामन्यात फ्लाॅप ठरला. त्यामुळे निवडकर्त्यांनी पंतला संघात स्थान दिलं आहे. पंतला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर चाहते खूप आनंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

रिषभ पंतनं (Rishabh Pant) भारतीय संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 616 दिवसांनंतर पुनरागमन केलं आहे.

सोशल मीडियावर चाहते पंतच्या पुनरागमनानं खूप खुश झाल्याचं दिसत आहे. तर अनेक चाहत्यांनी केएल राहुलची थट्टा उडवली आहे. एका यूजर्सनं लिहलं की, “संजू सॅमसनच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर केएल राहुलची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द देखील संपली आहे. केएल राहुल आणि संजू सॅमसन पुन्हा कधी खेळताना दिसणार नाहीत. पंत भारतासाठी खूप दिवस खेळू शकतो, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगटला अपात्र ठरवणारा कुस्तीचा नियम काय आहे? पैलवानाचं वजन कसं केलं जातं? जाणून घ्या
IND vs SL: एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर रियान पराग भावूक म्हणाला…
क्रिकेटपटू रिषभ पंतचं ‘एक्स’ खाते हॅक? नीरज चोप्रावर 10 लाख रुपयांच्या बक्षीसाचं ट्विट व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---