पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानला ऐतिहासिक यश मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू अर्शद नदीमने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. नदीमने अंतिम फेरीत 92.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील पाकिस्तानचे 32 वर्षांनंतर हे पहिले पदक आहे आणि भालाफेकमधील पहिले पदक आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नदीमवर पैशांचा वर्षाव होत आहे. दरम्यान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नदीमला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी नदीमला अविस्मरणीय अशी भेट देणार असल्याचेही सांगितले आहे.
नदीमकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. पहिल्या प्रयत्नात फाऊल करणाऱ्या नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरवर भाला फेकला. यानंतर इतर खेळाडूंवर दबाव आला आणि ते नदीमच्या जवळही जाऊ शकले नाहीत. गोल्डन बॉय नीरज चोप्रालाही 89.45 मीटरच्या थ्रोसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यानंतर पाकिस्तानला ऐतिहासिक यश मिळवून देणाऱ्या नदीमला आता अविस्मरणीय अशी भेट मिळणार आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नदीमच्या नावाने खानवाल शहरात स्पोर्टस सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नदीमसाठी मोठा सन्मान असेल. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
नदीमने ऑलिम्पिकमध्ये विक्रम केला
आतापर्यंत भालाफेकमधील ऑलिम्पिक विक्रम अँड्रियास थोरकिल्डसेनच्या नावावर होता. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने 90.57 मीटर भालाफेक करून हा विक्रम केला होता. आता नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून नवा ऑलिम्पिक विक्रम केला आहे. मात्र, भालाफेकमध्ये असा एक विक्रम आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.
झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूने भालाफेकमध्ये विश्वविक्रम केला आहे. तीन वेळा विश्वविजेता आणि ऑलिम्पिक चॅम्पियन झेक प्रजासत्ताकचा दिग्गज ॲथलीट जॅन झेलेझनी याने 1996 मध्ये एका ॲथलेटिक्स स्पर्धेत 98.48 मीटर भालाफेक करून विश्वविक्रम केला होता, आजपर्यंत कोणीही त्याच्या जवळही जाऊ शकले नाही.
ही वाचा –
2025च्या आयपीएल हंगामात पुनरागमन करणार ‘हे’ 3 धुरंधर?
इंग्लंडच्या दिग्गजानं निवडले जगातील टाॅप-5 फलंदाज, पाचव्या क्रमांकावर ‘या’ खेळाडूला स्थान
धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत