आज (07 ऑगस्ट) बुधवार पॅरिस ऑलिम्पिकचा 12 वा दिवस आहे. भारतासाठी 11 वा दिवस खूपच मनोरंजक होता. जिथे भारताला निराशेसोबत यश मिळाले. हॉकी संघाला उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, तर महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. याशिवाय नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.
आता आज म्हणजेच 12व्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण 4 सुवर्णपदके येणे अपेक्षित आहे. सुवर्णपदकासाठी सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर असतील. कुस्तीशिवाय 3000 मीटर स्टीपलचेस, मॅरेथॉन शर्यतीच्या जागतिक मिश्र रिले फायनल आणि वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकता येणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये ॲक्शन करताना दिसणार आहे.
याशिवाय अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये दिसणार आहे. अविनाश 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला. ॲथलेटिक्सच्या मॅरेथॉन शर्यतीच्या जागतिक मिश्र रिले अंतिम फेरीत प्रियांका आणि सूरज पनवार ही जोडी मैदानात उतरणार आहे.
भारताचे आजचे (7 ऑगस्ट) ऑलिम्पिक वेळापत्रक
ऍथलेटिक्स
मॅरेथॉन चालण्याची शर्यत मिश्र रिले (सकाळी 11 वाजता)
सूरज पनवार आणि प्रियांका गोस्वामी (पदक स्पर्धा)
पुरुषांची उंच उडी (दुपारी 1.35 वाजता)
सर्वेश कुशारे (पात्रता फेरी)
महिलांची 100 मीटर अडथळा फेरी
ज्योती याराजी (दुपारी 1.45 वाजाता)
महिला भालाफेक (दुपारी 1.55 वाजाता)
अन्नू राणी (पात्रता फेरी)
पुरुषांची तिहेरी उडी (रात्री 10.45 वाजता)
प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबूबकर (पात्रता फेरी)
पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरी (मध्यरात्री 1.13 वाजता)
अविनाश साबळे (पदक स्पर्धा)
महिला गोल्फ (दुपारी 12.30 वाजल्यापासून)
अदिती अशोक, दीक्षा डागर (पहिली फेरी)
टेबल टेनिस (दुपारी 1.30 वाजता)
महिला संघ उपांत्यपूर्व फेरी
(भारत विरुद्ध जर्मनी)
कुस्ती
महिला फ्रीस्टाइल 53 किलो (दुपारी 2.30 वाजल्यापासून)
अंतिम पंघल विरुद्ध झेनेप येतगिल (राऊंड ऑफ 16)
महिला 50 किलो फ्रीस्टाइल सामना (रात्री 11.20 वाजता)
विनेश फोगट (पदक सामना)
वेटलिफ्टिंग (रात्री 11 वाजाता)
महिलांची 49 किलो सामना
मीराबाई चानू (पदक स्पर्धा)
हेही वाचा-
Paris Olympics: सेमीफायलनमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव, हाॅकीमध्ये ‘सुवर्ण’पदकाच्या आशा संपल्या
“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघासाठी….” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सुंदरनं दिली प्रतिक्रिया
जंतर-मंतरबद्दल एक शब्द तोंडातून न निघालेले मोदी विनेश फोगटचं कौतूक कसं करणार?