Neeraj Chopra Fan :- भारताचा आघाडीचा भालाफेकपटू व टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पॅरिस ऑलिंपिक्समध्ये आपले हे पदक राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याच्याकडून संपूर्ण देशाला पदकाची अपेक्षा असताना त्याचा एक जबरा फॅन आता दिसून आला आहे. जो केवळ नीरज याला पाठिंबा देण्यासाठी चक्क सायकलवरून भारतातून पॅरिसमध्ये पोहोचला. त्या फॅनची आता सगळीकडे चर्चा होताना दिसतेय.
नीरजचा चाहता असलेला केरळचा हा व्यक्ती आहे फायिस अश्रफ अली. अली याने 15 ऑगस्ट 2022 पासून केरळ येथील कालिकत ते लंडन अशी सायकलवारी सुरू केली होती. त्यानंतर आता तब्बल 22 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत, तो पॅरिस येथे पोहोचला आहे. अली हा शांती व एकता असा संदेश देण्यासाठी या मोहिमेवर निघाला होता.
आपल्या या प्रवासादरम्यान गेल्या वर्षी अली हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे पोहोचला होता. त्यानंतर त्याला माहिती मिळाली होती की, नीरज चोप्रा देखील त्याच ठिकाणी सराव करत आहे. त्यावेळी त्याने केरळ येथे एका आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकास कॉल करून नीरजला भेटण्याची विनंती केली. नीरजने देखील मोठ्या मनाने त्याला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यावेळी अली याने आपण भारत ते लंडन असा प्रवास करत असल्याचे सांगितले. तेव्हा नीरजने पुढील वर्षी पॅरिस ऑलिंपिक्ससाठी येण्याची कल्पना त्याला सुचवली. पुढे अली याने योग्य ती कार्यवाही करत आता पॅरिसमध्ये प्रवेश केला आहे. तो नीरज चोप्रा याच्या पात्रता फेरी व अंतिम फेरीसाठी देखील स्टेडियममध्ये हजर असेल.
View this post on Instagram
नीरज याने 2022 टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच्या आधी एथलेटिक्समध्ये कोणत्याच भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेले नव्हती. यंदा देखील त्याच्याकडून सर्वांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. यावेळी त्याच्यासोबत भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना हा देखील पदकासाठी लढताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!
आशिया चषकातील दमदार प्रदर्शनाचं बक्षीस, स्मृती मंधानाची आयसीसी टी20 क्रमवारीत भरारी
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न