पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात बहुचर्चीत भालाफेक सामना गुरवारी (08 ऑगस्ट) पार पडला. ज्यामध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. 140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी गुरुवारी (08 ऑगस्ट) मध्यरात्री मैदानात उतरला होता. मैदानी क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा भारतीयांना होती. पण यावेळी त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
आता राैप्य पदक विजेत्या नीरज चोप्रासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवर चर्चा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांनी नीरजचे अभिनंदन केले. याशिवाय पंतप्रधानांनी नीरज चोप्रा यांच्याकडून दुखापतीबद्दल जाणून घेतले. तसेच, त्याच्या आईने दाखवलेल्या खेळाच्या भावनेचे पंतप्रधान मोदींनी खूप कौतुक केले. शिवाय नीरजच्या पुढील वाटचालीबद्दल देखील चर्चा केले.
#WATCH | PM Narendra Modi spoke to Javelin thrower Neeraj Chopra and congratulated him on the Silver medal. He also enquired about his injury and lauded the sportsman spirit shown by his mother.#Paris2024 #Paris2024Olympic pic.twitter.com/DvVEMcNbPQ
— ANI (@ANI) August 9, 2024
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राचे ट्विट करून अभिनंदन केले होते. मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तु असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमान वाटावा यासाठी प्रेरणा देत राहाल”.
Neeraj Chopra is excellence personified! Time and again he’s shown his brilliance. India is elated that he comes back with yet another Olympic success. Congratulations to him on winning the Silver. He will continue to motivate countless upcoming athletes to pursue their dreams… pic.twitter.com/XIjfeDDSeb
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2024
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवत रौप्यपदक जिंकून या भारतीय खेळाडूने भारताला पाचवे पदक मिळवून दिले. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले. यानंतर विकी कौशल, आर माधवन आणि मलायका अरोरा या बॉलिवूड स्टार्सह क्रिकेपटूंनी देखील नीरज चोप्राचे आभिनंदन केले.
हेही वाचा-
‘हे’ 3 दिग्गज खेळाडू उतरणार आयपीएलच्या मेगा लिलावात? संघांमध्ये होणार स्पर्धा?
गोलकीपर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत मिळाली ही महत्त्वाची जबाबदारी
सुवर्णपदक जिंकताच अर्शदवर पैशांचा पाऊस, पाकिस्तानने जाहीर केले चक्क इतक्या कोटी रकमेचे बक्षीस