Reetika Hooda :- पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुडा हिला महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या वजन गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी देशातील पहिली कुस्तीपटू 21 वर्षीय रितिका शनिवारी (10 ऑगस्ट) जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित किर्गिस्तानच्या आयपेरी मेडेट किझीकडून पराभूत झाली. सामना 1-1 अशा बरोबरीत असताना शेवटचा पॉइंट गमावल्यामुळे रितिकाला आपला सामना गमवावा लागला.
मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही रितिकाला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकण्याची संधी आहे. उपांत्यपूर्व फेरीत रितिकाला पराभूत करणाऱ्या कैझीने अंतिम फेरी गाठली तर, रितिकाला रेपेचेजमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल, जिथे भारतीय महिला कुस्तीपटूला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. रेपेचेजमध्ये ते कुस्तीपटू सहभागी होतात, ज्यांना पराभूत करणारा कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे रितिकाला कांस्य पदक जिंकायचे असल्यास सलग दोन विजय मिळवावे लागतील.
तत्पूर्वी, रितिकाने तांत्रिक आघाडीच्या जोरावर शानदार विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले होते. दोन वेळा युरोपियन चॅम्पियनशिप पदक विजेत्या हंगेरीच्या बर्नाडेट नागीचा 12-2 असा पराभव केला.
भारतासाठी रितिका पॅरिस ऑलिम्पिकमधील बदकाची अखेरची आशा आहे. इतर सर्व खेळातील भारताचे आव्हान संपुष्टात आले असून, रितिका रेपेचेजसाठी पात्र ठरल्यास ती स्पर्धेतील भारताची शेवटची स्पर्धक असेल. भारताने कुस्तीत यावेळी आत्तापर्यंत केवळ एक कांस्य पदक मिळवले आहे.
या स्पर्धेसाठी भारताने 117 खेळाडूंची पथक पाठवले होते. कमीत कमी दहा पदकांची अपेक्षा असताना भारतीय पथकाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताने आतापर्यंत एक रौप्य व पाच कांस्य पदके जिंकली आहेत. रितिका पदर जिंकण्यात यशस्वी ठरल्यास भारत टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या सर्वोत्तम सात पदकांची बरोबरी करेल. मात्र, यावेळी भारताला सुवर्ण पदकापासून वंचित राहावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरज चोप्राला आपल्या आवडीच्या मुलीशी करायचं आहे लग्न? आईचा मोठा खुलासा
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!