पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनल सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने बदली गोलकीपर आणला आणि 12 खेळाडूंसह खेळला, पण बरोबरी साधता आला नाही. पण टीम इंडिया अजूनही पदकाच्या शर्यतीत जिंवत आहे. कारण 8 ऑगस्टला कांस्यपदकासाठी सामना होणार आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने शानदार कामगिरी करत 15 मिनिटांत 2 गोल केले. भारतीय संघाला भरपूर पेनल्टी कॉर्नर मिळत होते, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर न करणे संघासाठी अडचणीचे ठरत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अखेर कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये जर्मनीने आक्रमक खेळ केला. परिणामी, सामन्याच्या 54व्या मिनिटाला जर्मनीने तिसरा गोल केला. भारताने अगदी शेवटच्या मिनिटांत बदली गोलरक्षक पीआर श्रीजेशला उतरवले आणि 12 व्या खेळाडूला मैदानात उतरवले. असे असूनही भारताचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
भारताला 1980 नंतर प्रथमच हॉकीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी होती. 1980 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते, पण त्या विजयाला 44 वर्षे उलटून गेली आहेत पण टीम इंडियाला कधीच ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आलेला नाही.
तसेच यावेळीही सुवर्णपदकाच्या आशा संपल्या आहेत, पण तरीही भारताला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. भारताला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके हॉकीमध्येच मिळाली आहेत. आजपर्यंत, भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य अशी 12 पदके जिंकली आहेत आणि आता ही संख्या 13 पदकांपर्यंत वाढवण्याची संघाला संधी असेल.
हेही वाचा-
विनेश फोगट फायनलमध्ये पोहचल्यावर पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
जंतर-मंतरबद्दल एक शब्द तोंडातून न निघालेले मोदी विनेश फोगटचं कौतूक कसं करणार?
“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघासाठी….” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सुंदरनं दिली प्रतिक्रिया