पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा 7 ऑगस्ट हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी विनेश फोगटचा महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा सामना होणार होता, परंतु त्याआधीच 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले होते. यावर पॅरिस ऑलिम्पिक 2024 भालाफेकपटू रौप्यपदक विजेता नीरज चोप्राने विनेश फोगटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया दिली. विनेश फोगटला अपात्र घोषित केल्यावर नीरजला देखील खूप दुःख झाले होते.
मंगळवारी (6 ऑगस्ट) दुपारी झालेल्या पहिल्या सामन्यात विनेश फोगटने जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. भारताचा टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजला जेव्हा विनेशच्या मोठ्या विजयाबद्दल कळले तेव्हा तो खूप आनंदी झाला. पण त्यांचा आनंद दुसऱ्याच दिवशी निराशेत बदलला, जेव्हा विनेशला अपात्रतेला सामोरे जावे लागले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना नीरज चोप्रा म्हणाला – “तिने येथे जे काही केले आहे, ते एक उदाहरण आहे. युई सुसाकीला पराभूत करणे ही एक मोठी उपलब्धी आहे. आणि त्यानंतर जे काही झाले, मला कुस्तीचे नियम माहित नाहीत.” मला तितकीशी समज नाही, पण ती आत्मविश्वासाने सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल करत होती, मग ती अपात्रत झाली आणि मी खूप दुःखी झालो.
नीरज पुढे म्हणाला- “विनेशचा प्रवास खूप खडतर होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरणे आणि त्यानंतर 2020 मध्ये आणखी दुखापतींना सामोरे जाणे. तिने अनेक वैयक्तिक अडचणींचा सामना केला. आणि त्यानंतर ती या टप्प्यावर पोहोचली आणि ती मानसिकदृष्ट्या खंबीर राहिली. सर्व काही ठीक चालले होते पण नंतर देवाने खुप चुकीचे केले.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राला पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागला. अर्शद नदीमने दुसऱ्या सेटमध्ये 92.97 मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी, नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक करून आपल्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो केले आणि रौप्य पदक जिंकण्यात यश मिळवले.
हेही वाचा-
Paris Olympics: आज भारताच्या खात्यात येऊ शकते ‘सहावे’ पदक, जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक
अफाट साैंदर्य पडलं महागात, जलतरणपटूला सुंदर असल्याकारणानं ऑलिम्पिमधून पडावं लागलं बाहेर
‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर