---Advertisement---

‘कार्तिकला संधी मिळते, मग…?’, खेळाडूला संघातून बाहेर ठेवल्यामुळे माजी दिग्गजाने विचारला प्रश्न

---Advertisement---

मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने आतापर्यंत अनेक सामने जिंकले आहेत. असे असले तरी, शमी मागच्या मोठ्या काळापासून भारताच्या टी-२० संघातून बाहेर आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने कही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ एकापाठोपाठ एक टी-२० मालिका खेळत आहे. पण या मालिकांमधून मोहम्मद शमी (Mohammad Shami) याचे नाव मात्र वगळले गेले आहे. अशात पार्थिव पटेल (Parthiv Patel) याच्या मते शमीकडे निवडकत्यांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. शमीला दरम्यानच्या काळात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी दिली गेली आहे आणि या सामन्यांमधील त्याचे प्रदर्शनही चांगले राहिले आहे. पार्थिवच्या मते दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) संघात पुनरागमन करू शकतो, तर शमीला देखील टी-२० संघात संधी मिळू शकते.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, “शमीला टी-२० संघात संधी मिळत नसल्यामुळे हैराण आहे. या गोलंदाजाला टी-२० संघात संधी मिळाली पाहिजे. दिनेश कार्तिकला आयपीएलमधील प्रदर्शनाच्या आधारे टी-२० संघात सामील केले जाऊ शकते, तर मग शमीला का नाही? त्याचे आयपीएल २०२२ मधील प्रदर्शन कार्तिकपेक्षाही चांगले होते. त्याने गुजरात टायटन्ससाठी विकेट्स घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मागच्या विश्वचषकापेक्षा (टी-२०) भुवनेश्वर सध्या चांगला खेळत आहे आणि शमीसोबतही असेच काही आहे. आता तो शेवटच्या षटकांमध्येही चांगली गोलंदाजी करू लागला आहे.”

दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये या दोघांच्या प्रदर्शनचा विचार केला, तर कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी काही सामन्यांमध्ये फिनिशरच्या रूपात जबरदस्त प्रदर्शन केले होते. तर शमीने देखील गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. शमीने हंगामातील १६ सामन्यांमध्ये ८ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि २० विकेट्स घेतल्या. हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो ६ व्या क्रमांकावर आहे. कार्तिकने या हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

दु:खद! ४००० धावा आणि १२० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरचे निधन

तब्बल १७ वर्षांनंतर ‘हा’ विश्वविजेता संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज, पीसीबीने जाहीर केलं वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---