---Advertisement---

शमीच्या पत्नीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांना आठवला जुना वाद; म्हणतीये, ‘ये प्यार-व्यार नही होता मुझसे…’

On: रविवार, जुलै 31, 2022 6:44 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या विश्रांतीवर आहे. आगामी काळातील आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर शमी भारतासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. याच कारणास्तव त्याला सध्या विश्रांती दिली गेली आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असला, तरी शमी सोशल मीडियापासून लांब असतो. परंतु त्याची पत्नी हसीन जहां हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि त्याची पत्नी हसीन जहां (Hasin Jahan) यांच्यात मागच्या बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. हसीन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिची चांगलीच चर्चा होत आहे आणि याचे कारण आहे तिची एक सोशल मीडिया पोस्ट. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून तिने ही पोस्ट शेअर केली आहे. इंस्टा रिलमध्ये हसीनने जो डायलॉग बोलला आहे, त्यामुळे ही पोस्ट अधिकच व्हायरल होत आहे.

हसीन जहां या इंस्टा रिलमध्ये हिंदी भाषेत बोलते. ती म्हणते की, “जे प्यार-व्यार नही होता मुझसे. लडाई करनी है तो बोलो.” हसीनचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईस्क आल्या आहेत आणि कमेंट्स करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. अनेकांनी या डायलॉगचा संबंध मोहम्मद शमीशी जोडला आहे. एका नेटकऱ्याने कमेटमध्ये म्हटले की, ‘शमीसोबत तू भांडणंच केलं आहे.’ तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “मोहम्मद शमी तुझ्यासोबत भांडणे करून करून दमला.”

https://www.instagram.com/reel/Cgl9ne9gKym/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, हसीन जहां एक मॉडेल आहे. मोहम्मद शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. मोहम्मद शमी अनेकदा तिच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतो. २०१८ मध्ये शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. यावेळी हसीनने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. हसीनने म्हटल्याप्रमाणे शमी तिच्यासोबत मारहाण करायचा. या वादानंतर हे दोघे वेगळे राहतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर

कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे

माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---