भारताचा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवार ( ९ डिसेंबर ,२०२०) रोजी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केले. निवृत्तीनंतर महत्वाच्या बाबी उलगडतांना पार्थिवने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील यशाचे श्रेय भारताच्या दोन दिग्गज कर्णधारांना दिले आहे.
निवृत्ती नंतर बोलतांना पार्थिव म्हणाला, ‘ संघ व्यवस्थापनात सौरव गांगुली सर्वोत्तम होते, ते खऱ्या अर्थाने एक लीडर होते , माझ्या कारकिर्दीत यशात सौरव गांगुली व अनिल कुंबळे या दोन कर्णधारांचा मोलाचा वाटा आहे. केवळ क्रिकेटमध्येच नाही तर वास्तविक जीवनात देखील मी सौरव गांगुली व अनिल कुंबळे यांच्याकडून अनेक बाबी शिकलो.
पार्थिव पुढे म्हणाला, ‘ मी अजुनही माझी पहिली टेस्ट कॅप जपून ठेवली आहे , जी मला दादा ( सौरव गांगुली) ने दिलेली होती. हेडींगली(२००२) व अॅडिलेड ( २००३-०४) कसोटी विजय तसेच रावलपिंडी येथे सलामीला येवून केलेले अर्धशतक हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते.
पार्थिवने निवृत्तीबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी मागील एक वर्षापासूनच निवृत्तीबद्दल विचार करत होता. आता निवृत्ती घेतल्यानंतर मला शांत झोप येवू शकते. पार्थिवने आपल्या १८ वर्षांच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये २५ कसोटी, ३८ एकदिवसीय व २ टी २० सामने खेळले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या आगमनामुळे पार्थिवला भारतीय संघात पुरेशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये १९४ सामन्यांत त्याने दहा हजारपेक्षा जास्त धावा बनवत उत्तम कमगिरी केलेली आहे.
पार्थिव पटेलशी संबंधीत लेख व बातम्या-
–निवृत्तीनंतर पार्थिव पटेलवर शुभेच्छांचा वर्षाव; पहा काही दिग्गजांचे हटके ट्विट
–अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
–अठरा वर्षांची छोटीशी; क्रिकेट कारकीर्द खेळलेला पार्थिव पटेल
–छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या या खास गोष्टी माहितीये का?