ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने भारत आणि त्यांच्या इतर प्रतिस्पर्धी संघांना चेतावनी दिली आहे. कमिन्स सध्या विश्रांतीनंतर पूर्णपणे फिट आणि भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तयार आहे. ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध मायदेशात मालिका खेळल्या, पण कामाचा तान कमी करण्यासाठी कमिन्सने या मालिका खेळल्या नव्हत्या.
जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळली. ही कमिन्सने खेळलेली शेवटची मालिका होती. या मालिकेनंतर घेतलेली विश्रांती त्याच्यासाठी फायदेशीर ठरली, असे पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तो आता विरोधी संघावर बरसणार आहे. विश्रांतीमुळे कमिन्सच्या थकलेल्या शरिराला आराम मिळाला आहे. दरम्यानच्या काळात त्याने कुटुंबियांसोबत वेळ घालवला. सध्या तो भारता आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी तयार करत असल्याचे दिसते. त्यानंतर त्याचे लक्ष फक्त आणि फक्त टी-20 विश्वचषकावर असेल. यावर्षीचा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्येच खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या मते विश्रांतीनंतर आगामी काळाताली व्यस्त वेळापत्रकासाठी तो तयार आहे. त्याला विश्वास आहे की, तो ज्या कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळेल, तिथे स्वतःची झाप सोडेल. कमिन्स म्हणाला की, “मी खूप काही खेळण्यासाठी उत्सुक आहे. जेणेकरून विश्वचषकाता माझा खेळ प्रत्यक्षात चांगला होईळ. मानसिक दृष्ट्या मला खरोखर ताजेतवाने वाटत आहे. ही एक चांगली विश्रांती होती.”
तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारतात दाखल झाला आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये 20 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियचा सलामीवीर फलंदाज डेविज वॉर्नर याला विश्रांती दिली गेली असून, मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस आणि मिशेल स्टार्क यांना दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवले गेले आहे. मालिकेतील दुसरा सामना 23 सप्टेंबर, तर तिसरा सामना 25 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तेव्हा’ युवरज बनला सिक्सर किंग! वाद फ्लिंटॉफचा पण किंमत मोजावी लागली स्टुअर्ट ब्रॉडला
LLC: भिलवाडा किंग्सच्या विजयात कॅरेबियन्स चमकले! युसुफची पुन्हा मॅचविनिंग खेळी
कॅप्टन अजिंक्य रहाणेची टीम फायनलमध्ये, शम्स मुलाणीच्या ‘पंच’ने विरोधी संघाचे लोटांगण