---Advertisement---

अगोदर पिता आणि आता पती बनलाय ‘हा’ क्रिकेटपटू, थाटात पार पडलं शुभमंगल

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 7:43 PM
Pat Cummins
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स लग्नबंधनात अडकला आहे. त्याने प्रेयसी बेकी बोस्टनशी लग्न केले आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला. तसेच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघे एकमेंकाना जवळपास ६ वर्षापासून डेट करत होते. तर २०२०मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. कोरोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातच दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या दोघांची लव्हस्टोरी एकदम हटके असून त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बायरन बेमधील चेताउ डू सोलेल (Chateau Du Soleil), न्यू साउथ वेल्स येथे प्रेयसी बेकी बोस्टनशी लग्न केले आहे. त्या दोघांना एक नऊ महिन्याचा मुलगा असून त्याचे नाव एल्बी आहे. या लग्नसोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायन आणि त्याची पत्नी एमा मोकार्थी हे उपस्थित होते. तसेच ट्रेविस हेड आणि मिशेल स्टार्क यांनी पण हजेरी लावली आहे.

कमिन्सने सोशल मीडियावर ‘जस्ट मॅरीड’, असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला आहे.

कमिन्स आणि बेकी यांची पहिली भेट २०१३मध्ये झाली होती. नंतर पुढे त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटी वाढल्या. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. बेकी ही मुळची ब्रिटेनच्या यॉर्कशायरची आहे. क्रिकेटमध्ये ब्रिटेनमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तर ही बाब या दोघांच्या नात्यात कधीच अडचणीचे कारण ठरली नाही.

कमिन्स आणि बेकी यांच्यात देशाच्या सीमेचे नाही तर वयाचे अंतर आहे. बेकी ही कमिन्सपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. कमिन्सचा जन्म ८ मे १९९३ला झाला तर बेकीचा जन्म १७ नोव्हेंबर १९९० ला झाला.

कमिन्सने ६ वर्ष बेकीला डेट करत २०२०मध्ये लग्नासाठी प्रपोज केले. त्याने ज्याप्रकारे प्रपोज केले ते पाहून बेकी आश्चर्यचकित झाली होती. एका मुलाखतीमध्ये बेकी म्हणाली, “कमिन्स त्यांना एका पिकनीकसाठी घेउन गेला. तेथे शॅम्पेनची बॉटल घेत, गुडघ्यावर बसून एकदम फिल्मीस्टाईलने लग्नासाठी प्रपोज केले.”

कमिन्स आणि बेकी यांचे लग्न एका वर्षापूर्वीच होणार होते, मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलले गेले. नंतर त्यांना ८ ऑक्टोबरला मुलगा झाला. त्याचे नाव एल्बी असे ठेवण्यात आले. मुलाचा जन्म झाल्यानंतर दहा महिन्यांनी दोघांनी लग्न केले आहे.

कमिन्सची मागील वर्षीच ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. त्याच्याआधी टिम पेन संघाचा कर्णधार होता. मात्र त्याला वादांमुळे कर्णधारपद गमवावे लागले. कमिन्स कर्णधार झाला त्यानंतर ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-० असा पराभव केला. वयाच्या १८व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो एक उत्तम वेगवान गोलंदाज असून फलंदाजीतही तो चांगली फटकेबाजी करतो. तसेच तो आयपीएलमध्येही खेळला आहे. २०१९मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याला ऍलन बॉर्डर मेडल मिळाले. जे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील महत्वाचे सन्मानचिन्ह आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमराह करतोय सुट्टी एन्जॉय! पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल

रोहित शर्मा इतिहास घडवणार! ‘ही’ कामगिरी केली तर मोडू शकतो पाकिस्तानी दिग्गजाचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---