---Advertisement---

ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा यू टर्न, विराट विषयी मी असे म्हणालोच नव्हतो

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 6:56 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आणखी तीन महिने अवकाश असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी शाब्दिक युद्ध सुरु केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने गेल्या महिन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधत त्याच्याबाबत सीडनी क्रिकेट मैदानावरील एक कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले होते.

“या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या भारतीय संघाला कसोटी मालिकेत आम्ही सहज पराभूत करु. त्याचबरोबर कर्णधार कोहलीला या कसोटी मालिकेत आम्ही एकही शतक करु देणार नाही. मला माहित आहे  की माझे हे वक्तव्य धाडसी आहे.” या शब्दात पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीला आव्हन दिले होते.

मात्र नुकतेच पॅट कमिन्सने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रसार माध्यमांनी त्याच्या विराट विषयीच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे असे तो म्हणाला.

तसेच पुढे कमिन्सने विराट कोहलीची स्तुती केली.

“विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, यामध्ये काही वाद नाही. त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी कोणाच्या प्रोहत्सानाची गरज लागत नाही.” असे कमिन्स  म्हणाला.

नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एमएस धोनीवर गौतम गंभीरची कठोर शब्दात टिका

-‘त्या’ सेलिब्रेशनचा जो रुटला झाला पश्चाताप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment