---Advertisement---

6 चेंडू 6 चाैकार, श्रीलंकेच्या युवा खेळाडूने वेस्ट इंडिजच्या स्टार गोलंदाजाला धो धो धुतले…

On: बुधवार, ऑक्टोबर 16, 2024 12:24 PM
Pathum-Nissanka
---Advertisement---

काल मंगळवारी (15 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजला अवघ्या 89 धावांत गुंडाळले. आणि 73 धावांनी विजय मिळवला. पथुम निसांकाला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पथुम निसांकाने 49 चेंडूत 54 धावा केल्या. आपल्या दमदार खेळीदरम्यान पाथुमने एका षटकात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफला झोडपून काढले. त्याने सहा चेंडूंत सहा चौकार मारले.

सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेची सुरुवात संथ होती. सलामीवीर कुसल मेंडिस आणि निसांका यांनी पहिल्या तीन षटकात केवळ आठ धावा केल्या होत्या. मात्र, निसांकाने चौथ्या षटकात गिअर बदलले आणि जोसेफला लागोपाठ सहा चौकार मारले. पहिल्या चेंडूवर श्रीलंकेला लेग बायच्या रूपात चौकार मिळाला. निसांकाने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू वाईड होता. तिसऱ्या चेंडूवर निसांकाने पुल मारला पण चेंडू हवेत गेला. मात्र, जेथे चेंडू पडला तेथे क्षेत्ररक्षक नसल्याने त्याला चौकार मिळाला. त्याने शामरच्या या एकाच षटकात एकूण 25 धावा ठोकल्या.

 

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 16.1 षटकांत 89 धावांत सर्वबाद झाला. कर्णधार रोव्हमन पॉवेलने संघाकडून 20 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. तिसऱ्या षटकात 12 धावांवर ब्रँडन किंगच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर पुढच्याच षटकात एविन लुईस बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात रोस्टन चेस पॅव्हेलियनमध्ये परतला. याप्रमाणे संघाने झटपट विकेट गमावल्या.

श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना ड्युनिथ वेललागेने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कर्णधार चरिथ असलंका, महिष तिक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. उर्वरित एक विकेट मथिशा पाथिरानाने मिळवले.

हेही वाचा-

गुरुवर शिष्य भारी! महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांचा शिष्याकडून पराभव
कसोटीनंतर, वनडे आणि टी20 मालिकेची घोषणा, पाहा संपूर्ण वेळापत्रक!
आपल्याच खेळाडूच्या कानशीलात लगावली, या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं तत्काळ निलंबन!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---