तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळायचा आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर लगेच किवी संघ पुन्हा एकदा श्रीलंका दाैरा करणार आहे. जिथे संघाला 2 टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी न्यूझीलंड संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. ज्यामध्ये त्यांची नजर या स्पर्धेच्या तयारीवर असणार आहे. या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रकही न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केले आहे. ज्यामध्ये पहिली 2 सामन्यांची टी20 मालिका 9 नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल.
Tour News | The dates have been confirmed for the team’s FIVE match (2xT20Is, 3 x ODIs) white ball tour of Sri Lanka next month.
Schedule | https://t.co/KQhiQUjlDg #SLvNZ pic.twitter.com/Z6C7uh8XwC
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 16, 2024
न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर संघ श्रीलंकेला रवाना होईल. ज्याठिकाणी संघाल 2 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन्ही सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी डंबुला मैदानावर खेळायचे आहेत. यानंतर 13 नोव्हेंबरपासून उभय संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. त्यातील पहिला सामना देखील डंबुला मैदानावर खेळवला जाईल. वनडे मालिकेतील शेवटचे 2 सामने 17 आणि 19 नोव्हेंबर रोजी कँडीच्या मैदानावर खेळवले जातील. अलीकडेच श्रीलंकेने मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ही मालिका किवी संघासाठी सोपी जाणार नाही.
श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेची घोषणा होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाने नुकतीच यजमान श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. ज्यामध्ये त्यांना एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे टीम साऊदीने न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेसाठी टॉम लॅथमला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.
हेही वाचा-
आपल्याच खेळाडूच्या कानशीलात लगावली, या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं तत्काळ निलंबन!
ऍशेस मालिकेची घोषणा; 43 वर्षात प्रथमच या ऐतिहासिक मैदानात सामना, पाहा संपूर्ण वेळापत्रक
SL vs WI: श्रीलंकेचा पलटवार, वेस्ट इंडिजचा दारुण पराभव, मालिकेत बरोबरी






