---Advertisement---

श्रीलंकेला लागला मोठा झटका, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू मालिकेबाहेर

On: सोमवार, जुलै 11, 2022 2:47 PM
Sri Lanka vs AUS
---Advertisement---

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे श्रीलंकेसाठी दुसरा सामना जिंकणे गरजेचे आहे. मात्र श्रीलंकेच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. वनडे मालिकेपासून फॉर्मात असलेला पाथुम निसांका कोरोना पॉजिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे त्याला चालु सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे.

निसांकाला पकडून आतापर्यंत या दौऱ्यातील कोरोना प्रकरणांची संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे. निसांकाने एक दिवस आधी बरे वाटत नसल्याचे कळवले आणि कोरोना चाचणीनंतर तो कोरोना पॉजिटिव्ह आढळला. दरम्यान त्याला एका हॉटेल रुममध्ये आयसोलेट केले गेले आहे. तर त्याच्या ऐवजी ओशादा फर्नांडोला अंतिम ११ मध्ये खेळवण्यात येणार आहे.

गॉल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सध्या यजमान संघ वरचढ दिसत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---